Home Breaking News राज्यातील हे जिल्हे आहेत रेडझोनमध्ये?

राज्यातील हे जिल्हे आहेत रेडझोनमध्ये?

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9478*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

128 views
0

राज्यातील हे जिल्हे आहेत रेडझोनमध्ये?

 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई : राज्यातील कोरोना प्रादुर्भाव असलेल्या रेड झोनमधील जिल्हे वगळता 1 जूननंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. माहितीप्रमाणे रेड झोनमध्ये राज्यातील 14 जिल्हे आहेत. तेथील निर्बंध सरसकट शिथिल करता येणार नाहीत. कन्टेन्मेंट झोन करुन तिथे नियम कडक करावे लागतील, तर जिथे रुग्ण संख्या कमी तिथे नियम शिथिल करावे लागतील, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान राज्यात लॉकडाऊन लावूनही काही जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या म्हणावी तशी कमी झालेली नाही. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या पार्श्वभूमीवर नुकतीच पंधरा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या पंधरा जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन असूनही कोरोनबाधितांची संख्या कमी होत नसल्याची माहिती आहे.

राज्यातील हे जिल्हे आहेत रेडझोनमध्ये?

 • बुलढाणा (Buldhana)
 • कोल्हापूर(kolhapur)
 • रत्नागिरी(Ratnagiri)
 • सांगली(sangli)
 • यवतमाळ(yavatmal)
 • अमरावती(amravati)
 • सिंधुदुर्ग(Sindhudurga)
 • सोलापूर(Solapur)
 • अकोला(Akola)
 • सातारा (Satara)
 • वाशीम (Washim)
 • बीड (Beed)
 • गडचिरोली(Gadchiroli)
 • अहमदनगर (Ahemdnagar)
 • उस्मानाबाद (Osmanabad)