Home आध्यात्मिक बुद्ध जयंतीनिमित्त 26 मे रोजी “अत्त दीप भव” संगीत कार्यक्रम

बुद्ध जयंतीनिमित्त 26 मे रोजी “अत्त दीप भव” संगीत कार्यक्रम

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9468*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

137 views
0

बुद्ध जयंतीनिमित्त 26 मे रोजी “अत्त दीप भव” संगीत कार्यक्रम

– दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरचा उपक्रम

विदर्भ वतन न्यूज पोर्टल : नागपूर : केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या अधीन कार्यरत नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंर्द्- एस.सी.जेड.सी.सी. द्वारे “बुद्ध जयंती” निमित्त 26 मे रोजी सकाळी 11 वाजता “अत्त दीप भव” या संगीत कार्यक्रमाचे आॅनलाइन आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम या केंद्राच्या ँ३३स्र२://६६६.८ङ्म४३४ुी.ूङ्मे/४२ी१/२ू९ूू या यूट्यूब वाहिनीवर थेट प्रसारित होणार असून या सुमधुर संगीताच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्ध यांच्यावर आधारित हिंदी, मराठी गीतांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमामध्ये सारेगामापा स्पर्धा विजेती, पार्श्वगायिका श्रीमती आकांक्षा नगरकर देशमुख आणि सारेगामापा फेम पार्श्व गायक पियुष वाघमारे आपली गाणी सादर करतील. या आॅनलाइन कार्यक्रमात सहभागी होण्याच आवाहन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरतर्फे करण्यात आले आहे,