Home Breaking News राज्य सरकार चार टप्प्यात अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात करणार…

राज्य सरकार चार टप्प्यात अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात करणार…

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9464*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

45 views
0

राज्य सरकार चार टप्प्यात अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात करणार…

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई : राज्य सरकार चार टप्प्यात अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात दुकाने उघडली जातील. गेल्या काही दिवसांत दुकाने बंद असल्यामुळे राज्यातील व्यापार्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी पहिल्या टप्प्यात हे सर्व व्यवहार सुरु करण्यावर सरकार भर देण्याची शक्यता आहे. तर तिसर्‍या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंटस, बार सुरु करण्यात येतील. त्यानंतर चौथ्या टप्प्यात सरकारकडून लोकल सेवा आणि धार्मिक स्थळे सुरु केली जातील. तसेच रेडझोनमधील जिल्ह्य़ांना वगळले जाणार आहे. जिल्हाबंदी कधी उठवायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. एप्रिल महिन्यात राज्यात दररोज ७0 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा ३0 हजारांच्या खाली आला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील माध्यमांशी बोलताना लॉकडाऊनबाबत महत्त्वाची माहिती दिली होती.
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या मोठ्या शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत लक्षणीय घटली आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे या शहरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ग्रामीण भागांत कोरोनानं हातपाय पसरले आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले. १ जूनपासून निबर्ंध टप्प्याटप्प्यानं शिथिल केले जातील. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांमधील निबर्ंध हळूहळू मागे घेतले जातील, असं राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
सध्या राज्यात कठोर निबर्ंध लागू आहेत. दुकाने केवळ सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू ठेवण्याची मुभा आहे. याचा परिणाम अनेक ठिकाणी दिसून आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. मुंबईसह एमएमआर रिजनमधील स्थिती नियंत्रणात आहे. नाशिक, नागपूरमधील परिस्थितीदेखील चिंताजनक नाही. त्यामुळे या भागातील निबर्ंध १ जूनपासून हळूहळू शिथिल केले जातील. निबर्ंध एकदम मागे घेण्याऐवजी टप्प्याटप्याने मागे घेतले जातील. कोरोना रुग्णसंख्या कमी झालेल्या जिल्ह्यांसाठी या प्रकारचे निर्णय घेतले जातील, असं राजेश टोपे यांनी सांगितले.