सात्त्विक नक्षी असलेले अलंकार व्यक्तीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9459*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

179

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत अलंकारांविषयी संशोधन सादर !

सात्त्विक नक्षी असलेले अलंकार व्यक्तीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक !

     ‘अलंकार हे समाजाला आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक लाभ मिळवून देऊ शकतात, तसेच स्त्रियांना त्यांच्या साधनेत साहाय्यभूत होऊ शकतात. धातूंमध्ये सुवर्णहा आध्यात्मिकदृष्ट्या सर्वाधिक लाभदायक धातू जरी असला, तरी या धातूपासून बनवलेल्या अलंकारांची नक्षी सात्त्विक नसल्यास त्यापासून अलंकार परिधान करणार्‍याला अपेक्षित आध्यात्मिक लाभ मिळू शकत नाही. अलंकार कसा बनवला आहे, यावर त्यातून सात्त्विक, राजसिक कि तामसिक स्पंदने प्रक्षेपित होतील, हे ठरते. हा आध्यात्मिक स्तरावरील दृष्टीकोन ज्ञात नसल्यास केवळ मानसिक स्तरावर विचार करून निवडलेल्या अलंकाराद्वारे व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या फारसा लाभ मिळत नाही. त्यामुळे सात्त्विक नक्षी असलेला अलंकार व्यक्तीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे’, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या पू. (सौ.) भावना शिंदे यांनी केले. त्या दी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट, श्रीलंकायांनी आयोजित केलेल्या ७ व्या वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन वूमन्स स्टडीज्2021’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होत्या. या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी अलंकारांचा स्त्रियांवर आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होतो ?’ हा शोधनिबंध सादर केला. या शोधनिबंधाचे लेखक परात्पर गुरु डॉ. आठवले असून पू. (सौ.) भावना शिंदे सहलेखिका आहेत.

    या परिषदेतील सांस्कृतिक आदानप्रदानाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने करण्यात आलेले संगीत आणि नृत्य यांचे प्रत्येकी एक एक सात्त्विक सादरीकरण आणि त्यांचा आध्यात्मिक स्तरावर होणारा परिणाम यांविषयी संशोधनावर आधारित एक चलचित्र दाखवण्यात आले. गळ्यातील तीन प्रकारच्या हारांचे ते परिधान करणार्‍यांवर होणारे सूक्ष्म परिणाम अभ्यासण्यासाठी प्रभावळ आणि ऊर्जा मापक यंत्र अन् सूक्ष्म परीक्षण यांच्या माध्यमातून केलेल्या संशोधनाची माहिती पू. (सौ.) भावना शिंदे यांनी उपस्थितांना दिली. या संशोधनासाठी माजी अणु वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी विकसित केलेल्या यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा आणि पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. ‘यू.टी.एस्.’ आणि पिपयांद्वारे वस्तू अन् व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा(‘ऑराचा) अभ्यास करता येतो.

    या संशोधनाच्या अंतर्गत केलेल्या प्रयोगात तीन प्रकारच्या हारांचे परीक्षण केले. पहिला हार फॅशन ज्वेलरीकिंवा जंक ज्वेलरीया प्रकारात मोडणारा होता. दुसरा आणि तिसरा हे दोन्ही हार २२ कॅरेट सोन्याचे होते. दुसर्‍या हाराची नक्षी असात्त्विक होती, तर तिसर्‍या हाराची नक्षी सात्त्विक होती. पहिल्या आणि दुसर्‍या हारातून नकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत असल्याचे, तर केवळ तिसर्‍या हारातून सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत असल्याचे प्रभावळ आणि ऊर्जा मापक यंत्रांनी केलेल्या परीक्षणात दिसून आले. यातून सात्त्विक नक्षी असलेला अलंकार व्यक्तीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे, हे स्पष्ट झाले.या तीन हारांची तसेच बांगडी, अंगठी या अलंकारांची सूक्ष्म स्पंदनशास्त्राचा अभ्यास करून काढलेली चित्रे या वेळी पू. (सौ.)भावना शिंदेे यांनी सर्वांना दाखवली. त्यामुळे उपस्थितांना सात्त्विक आणि असात्त्विक अलंकारांसंदर्भात सूक्ष्मातून घडणारी प्रक्रियाही जाणता आली.