युगानुयुगे माणसे संकटावर मात करतात-डाॅ. कैलास दौंड

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9455*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

292

युगानुयुगे माणसे संकटावर मात करतात

बा
कोरोना
कुठल्या युगाचा
सुड उगवत आहेस तू?
अगदी हतबल करून टाकले आहेस
जगालाच अवघ्या तू.
आमच्यातील एकेकाला तू घेतोहेस
तुझ्यात सामिल करून
अगदी त्यांच्याही नकळत  ;
तुला दुरच ठेवण्यासाठी
आम्ही बसतो आहोत सॅनिटायझरने हात चोळत,
मास्कने झाकत आहोत नाक तोंड
पण सामाजिक अंतर राखणे अवघड जातेय सर्वांना.
एक तर माणूस सामाजिक प्राणी आणि त्यात –
लोकसंख्येचा विस्फोट नि
अभावाची बजबजपुरी,
सर्वत्र गर्दी गोंगाट आणि बाजारासारखी स्थिती
जोडीला नसानसात भीणलेली उत्सव प्रियता .
मग ओसंडून वाहणारी इस्पितळे आणि कोविड छावण्या
भरवतात धडकी मनामनात सर्वकाळ,
कित्येक लोक येताहेत धाडसाने तुला हरवून
पुन्हा आपल्या माणसात
मानवतेने उभ्या केलेल्या यंत्रणा थांबू पाहताहेत वाताहत.
येताहेत तुझ्या लाटामागुन लाटा
अंगावरती येत आहे काटा,
पहिल्या लाटेतील बेफिकीरी दुसर्‍या लाटेत रुपांतरीत झाली
बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, लस सर्व व्यवस्था तोकडी झाली ,
धजावत नाही जीभ पण
स्मशानालाही प्रेते भार झाली.
युगानुयुगाची पवित्र गंगा
मढ्यांना घेऊन वाहती झाली.
पहिल्या लाटेत माणुसकी होती ओतप्रोत वाहिली
रस्त्यारस्तावर विचारली जात होती भुकेची खुशाली,
नाही असे नाही अजुनही पेटताहेत माणुसकीच्या मशाली.
बा
कोरोना
तू नवखा आहेस या धरेवर
माणसाच्या प्रयत्नापुढे तू ठरणार नाहीस अनावर,
माणसे भांबावतात, हतबल होतात, सावरतात,
माणसे धीर धरतात, धीर देतात, अश्रू पुसतात,
युगानुयुगे माणसे संकटावर मात करतात!
~~
~~
डाॅ. कैलास दौंड