Home Breaking News सकाळी 9.15 वाजता साता-याला भूकंपाचे हादरे

सकाळी 9.15 वाजता साता-याला भूकंपाचे हादरे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9435*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

125 views
0

सकाळी 9.15 वाजता साता-याला भूकंपाचे हादरे

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : सातारा – संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत होरपळत असतानाच कुठे वादळ, कुठे अवकाळी पाऊस, तर कुठे भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिक हादरत आहेत. साताऱ्यामधील काही भागांमध्ये आज सकाळी ९.१६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोयना धरणापासून १० किलोमीटरच्या परिसरातील भागात हा सौम्य धक्का जाणवला. यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसल्याची माहिती पाटण महसूल विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मागील २ महिन्यांमध्ये कोयना धरण परिसरात बसलेला भूकंपाचा हा तिसरा धक्का असल्याने स्थानिकांमध्ये भिती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.