Home Breaking News आशांचा सोमवारी देशव्यापी संप, राष्ट्रीय फेडरेशनचा निर्णय

आशांचा सोमवारी देशव्यापी संप, राष्ट्रीय फेडरेशनचा निर्णय

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9422*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

102 views
0

आशांचा सोमवारी देशव्यापी संप, राष्ट्रीय फेडरेशनचा निर्णय

-आशांना शासकीय सेवेत समावून घ्यावे आणि किमान 22 हजार वेतन द्यावे ही सीटूची मागणी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : आशा व गट प्रवर्तकांच्या राष्ट्रीय फेडरेशनने दि.२४ मे २०२१ रोजी , देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यांच्या मागण्या रास्त असून आशा व गट प्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे व किमान २२००० वेतन द्यावे अशी मागणी सीटू करीत असून नागपूर जिल्ह्यातील सर्व आशा व गट प्रवर्तकांनी या लाक्षणिक संपात स्वयंस्फूतीर्ने सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आशा व गट प्रवर्तक यांना कोरोना काळात नियमित कर्मचा-या प्रमाणे राबविले जात आहे. परंतु त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. उलट त्यांना अधिकारी काढून टाकण्याची धमकी देतात तर सर्वेक्षणाला गेल्यावर अनेकदा त्यांच्या वर हल्लेही झाले आहेत. कोविड काळात सक्षम व समर्थपणे सेवा देणा-या या आघाडीच्या कामगारांना कोविड योध्दा म्हणून गौरविण्यात आले, ही अभिमानाची बाब असली तरी त्यांना गरजेपुरता मोबदला दिला जात नाही. अशा भयंकर महामारीत काम करताना कांहीनां प्राण गमवावे लागले. परिणामी त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले, मुले पोरकी झाली.
तरीही केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. आशा व गट प्रवर्तकांच्या राष्ट्रीय फेडरेशनने दि.२४ मे २०२१ रोजी , देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यांच्या मागण्या रास्त असून आशा व गट प्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे व किमान २२००० वेतन द्यावे अशी मागणी सीटू करीत असून नागपूर जिल्ह्यातील सर्व आशा व गट प्रवर्तकांनी या लाक्षणिक संपात स्वयंस्फूतीर्ने सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनिकर, नंदा लीखार, मंगला बागडे, लक्ष्मी कोतेजवार, रुपलता बोंबले, पौर्णिमा पाटील, उषा ठाकूर, उज्वला कांबळे, माया कावळे, शुभांगी चीचमलकर, विजेता नितनवरे, कल्पना हटवार, निता भांडारकर, सारिका जावळे, अंजु चोपडे, विशाखा चौधरी, कल्पना राऊत, अर्चना ठाकरे, मंदा जाधव, वंदना बहादूरे, सरिता ठवरे, हेमलता हातीठेले, रेखा पानतावणे, सारिका लांजेवार, सपना गणवीर, संगीता मेश्राम, सोनाली धांडे इत्या. नागपूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक सीटूच्या वतीने आवाहन केले आहे अशी माहिती अध्यक्ष- राजेंद्र साठे यांनी दिली.