Home आरोग्य एक हात मदतीचा…उपक्रम

एक हात मदतीचा…उपक्रम

0
एक हात मदतीचा…उपक्रम

एक हात मदतीचा…उपक्रम

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, यवतमाल : गायत्री परिवार व आशिष शुक्ला युवक मित्र परिवार उमरी रोडच्या माध्यमातून ख्रिश्चन हॉस्पिटल उमरी रोड येथील रुग्णांना तसेच नातेवाईकांना ‘आम्ही देत आहोत एक हात मदतीचा…’ या उपक्रांतर्गत सकाळचा नाश्ता, जेवण, आणि संध्याकाळचे जेवण देण्यात येत आहे. या कार्यास यशस्वी करण्यासाठी उमरी गावातील प्रत्येक तरुण कोणत्या न कोणत्या स्वरूपात आपला एक हात मदतीसाठी पुढे करतो आहे. संपूर्ण तरुण मित्रांनी हे जे सेवेचे व्रत आपण हातात घेतले आहे, आपणा जो रुग्णसेवेचा वसा घेतलेला आहे हा वसा आपल्याला आता टाकता येणार नाही. कारण संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यात आपल्या या उपक्रमाची दखल घेतली जात आहे. आपले उमरी गाव पूर्वीपासूनच चांगल्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, परंतु जगाच्या पाठीवर एवढी मोठी महामारी आली असताना आपल्या उमरी गावातील प्रत्येक युवक रुग्णसेवेचा वसा हाती घेऊन या कठीण प्रसंगी देखील रुग्णांची सेवा करतो आहे. युवक मित्रांना एकच विनंती आहे की या कार्यास प्रत्येकाचा किमान खारू ताईचा तरी वाटा लाभावा… आणि हे सर्व करत असताना कोण काय करतो यापेक्षा आपण काय करू शकतो याकडेच आपले लक्ष असणे आवश्यक आहे. ही वेळ थांबायची नाही मित्रांनो ही वेळ आहे आपण सुरु केलेले कार्य अविरत सुरू ठेवण्याची आणि हे सर्व करत असताना आपण आपली काळजी कशी घेतो हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. असे आवाहन आशीश शुक्ला यांनी केले. हॅन्ड ग्लोजचा वापर करणे, न चुकता डबल मास्कचा वापर करणे, आणि वारंवार सॅनिटायजरचा वापर करणे,ही सुरक्षेची त्रिसूत्री आपण लक्षात घेणे आवश्यक आहे कारण इतरांची सेवा करतानाच आपल्याला आपला परिवार सुद्धा सुरक्षित ठेवायचा आहे, असेही शुक्ला यांनी सांगीतले.