Home आंतरराष्ट्रीय नवीनतम इस्रायल पॅलेस्टिन लढ्याची मिमांसा -कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

नवीनतम इस्रायल पॅलेस्टिन लढ्याची मिमांसा -कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

0
नवीनतम इस्रायल पॅलेस्टिन लढ्याची मिमांसा -कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

नवीनतम इस्रायल पॅलेस्टिन लढ्याची मिमांसा

-कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

इस्रायल आणि मेडिटरेनियन समुद्रामधील चिंचोळ्या भूभागाला गाझा स्ट्रीप म्हणतात.१९४८मधे इस्रायलची निर्मिती झाल्यावर तेथील अनेक अरबांनी स्थलांतर केल. फाळणीच्या नक्ब्यानंतर (कॅटास्ट्रोफ), ह्या लोकांनी गाझा स्ट्रीपमधे आश्रय घेतला.मागील ७० वर्षांपासून या भूभागातील असंख्य शरणार्थी खेमे/लहान गावांमधे वीस लाखांवर पॅलेस्टिनियन्स राहतात.मात्र येन केन प्रकारेण हा भूभाग परत घेण्याचा विडा इस्रायलनी त्याच वेळी उचलला होता आणि आताही तो यावर ठाम आहे.१९८०च्या दशकात हमास आणि नंतर पॅलेस्टिनियन इस्लामिक जिहाद (पीआयजे) या अरब आतंकवादी संघटनांनी पॅलेस्टिनमधे बस्तान मांडल.इस्रायलमधे;महाराष्ट्र/गुजराथमधील ६०,००० बेने इस्रायली,कोचीन/केरळ इलाक्यातील २५,००० कोचीनी यहुदी,कोलकता/पश्चिम बंगाल क्षेत्रातील २००० बगदादी यहुदी आणि मिझोराम/मणिपूरमधले ४००० बेनी मनाशे असे जवळपास ९०,००० भारतीय राहतात.दुर्दैवानी या नवीनतम लढ्यात केरळची सौम्या संतोष मारल्या गेली.
मागील सात दशकांपासून इस्रायलमधील कट्टर ज्यू “डेथ टू अरब” हा घोषा लावत असल्यामुळे आणि अरब देश इस्रायलच अस्तीत्वच संपवण्याच्या मागे असल्यामुळे,तेथील ज्यू आणि अरबांमधे कमालीचा तणाव आहे.पॅलेस्टिन व इस्रायलमधे सांप्रत सुरु असलेल्या लढ्याच्या आधी इस्रायल व पॅलेस्टिनमधे;ऑपरेशन कास्ट लिड २००८/९ (१३९८ पॅलेस्टिनियन व ७० इस्रायली मृत),ऑपरेशन पिलर ऑफ डिफेंस २०१२ (१७० पॅलेस्टिनियन व ८ इस्रायली मृत) आणि ऑपरेशन प्रोटेक्टिव्ह एज २०१४ (२२५० पॅलेस्टिनियन व २६ इस्रायली मृत); हे तीन मोठे लढे झालेत.२०२०मधे अमेरिका,इस्रायल आणि युनायटेड अरब एमिरातनी; अब्राहम अकॉर्डवर हस्ताक्षर केलेत.त्याच धर्तीवर इस्रायलनी बहरीन,सुदान आणि मोरोक्कोशी तसाच करार केला.या अकॉर्डनुसार,या चारही देशांनी इस्रायलला एक राष्ट्र म्हणून मान्यता दिली. मात्र अमेरिका व यूएईच्या दडपणासमोर मान न तुकवणाऱ्या पॅलेस्टिननी यावर हस्ताक्षर करण्यास सपशेल नकार दिला.
मे,२०२१च्या सुरवातीला जेरुसलेमच्या अल अक्सा मशिदीतील नमाजानंतर तेथील अरब मुस्लिमांनी हिंसक प्रदर्शन केली.इस्रायलच्या सुरक्षादलांनी बळाचा वापर करून ती मोडून काढलीत. त्याच्या उत्तरार्थ हमासनी इस्रायलवर रॉकेट/क्षेपणास्त्र हल्ला केला.सांप्रत लढा १० मे,२०२१ला,इस्रायली विमानांच्या गाझा पट्टीमधल्या हमास व पॅलेस्टिनियन इस्लामिक जिहाद (पीआयजे) या अरब आतंकवादी संघटनांच्या मुख्यालयावरील हल्ल्यानंतर सुरू झाला.आधिकारिक माहितीनुसार आजमितीला गाझा पट्टीत २९६ पॅलेस्टिनियन मारल्या गेले असून १७००वर जखमी झाले आहेत आणि ८२,००० घरादाराला मुकले आहेत.उलटपक्षी,२७ इस्रायली मारल्या गेले असून १८२ जखमी झाले आहेत.सांप्रत सुरू असलेल्या लढ्याच्या फलस्वरूप;वेस्ट बॅँकमधील रमल्लाह,नबलस व इतर सहा लहान शहर आणि लेबनान सीमेवर शेकडो पॅलेस्टिनियन्सनी काटेरी कुंपण तोडून; निदर्शन,दंगे,रास्ता रोको आंदोलन आणि इस्रायली सुरक्षादलांवर;दगड,पेट्रोल बॉम्ब आणि इतर हत्यारांद्वारे अनेक हल्ले केलेत. सीरियामधून सहा रॉकेट्सही डागण्यात आलीत.लढ्यात हमास/ पीआयजेनी;दक्षिण व मध्य इस्रायल,जेरुसलेम आणि इस्स्रायल किनार पट्टीवर ३९३७ क्षेपणास्त्र/ रॉकेट्सचा मारा केला.उत्तरादाखल इस्रायलनी २३८ विमान हल्ल्यांमधून (एयर सॉर्टीज) सहाशे लक्ष्यांवर हल्ले करून हमास/पीआयजेचा कणा मोडला.
हा लेख प्रसिद्धीस जाईस्तोवर, इस्रायली डिफेंस फोर्सेस (आयडीएफ) व हमास/पीआयजे यांच्यात गोळीबार आणि क्षेपणास्त्र/रॉकेट/विमान हल्ले सुरूच होते.त्यात,अल जझिरासारख्या अरब प्रसारमाध्यमांची मुख्यालय,हमास/पीआयजेचे अनेक कमांडर्स आणि तीन क्षेपणास्त्र/रॉकेट निर्मिती संसाधन ध्वस्त/नष्ट झालीत.अजूनही हा लढा संपुष्टात येण्याचे काहीच आसार उजागर झालेले नाही. हमास प्रवक्ता अबू ओबैदानुसार “वुई हॅव मच मोअर टू गिव्ह. डिसिजन टू हिट तेल अविव्ह,दिमोना अँड जेरुसलेम इज ऍझ इझिअर फॉर अस ऍझ ड्रिंकिंग वॉटर.युअर टेक्नॉलॉजी अँड असेसिनेशन्स डोन्ट स्केअर अस”.मागील साथ वर्ष इस्रायलशी एकहाती लढा देणाऱ्या हमासकडे, रशियन बनावटीच्या एके ४७/५६ रायफल्स, बीएम २१ ग्रॅड रॉकेट लॉन्चर्स,एम ३०२ अनगायडेड आर्टिलरी रॉकेट्स, अँटी सबमरीन रिमोट कंट्रोल्ड ऍपरेटस सिस्टीम आणि चीनी बनावटीचे डब्ल्यूएस १ रॉकेट्स आहेत. ताज्या बातमीनुसार हमास, दूर संचालित पाणडुबी वेधक प्रणालीद्वारे इस्रायली पाणडुबीवर हल्ला करण्याची संधी शोधत असतांना इस्रायली युद्धपोतांनी ती प्रणाली ध्वस्त केली.इस्रायलकडे ऍरो अँटी बॅलेस्टिक मिसाईल्स, कमी पल्ल्याच्या रॉकेट धबधब्याचा (शॉर्ट रेंज रॉकेट बराज) सामना करणारी आयर्न डोम अँटी मिसाईल डिफेंस सिस्टीम, मर्व्हका टँक्स,ऍटमॉस हविट्झर्स,मायक्रो टेव्हर असॉल्ट रायफल्स,आर्मर्ड पर्सनल कॅरियर्स,अत्याधुनिक वायुदल/नौदल आणि अण्वस्त्र आहेत.शत्रूच्या रॉकेट्स/क्षेपणास्त्रांना लक्ष्या पर्यंत पोचण्या आधीच त्यांची ओळख पटवून (आयडेंटिफाय),मागोवा काढत (ट्रॅकिंग) त्यांना ध्वस्त करण्यासाठी त्या रॉकेट/क्षेपणास्त्रांच प्रगत रडार अनालिसिस करण्याची क्षमता आयर्न डोम या हत्यार प्रणालीत आहे.
कुठलीही पारंपरिक रॉकेट/ क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली,एकाच वेळी मोठ्या संख्येत येणाऱ्या अस्त्रांना संपूर्णतः रोखू/थांबवू शकत नाही.आयर्न डोम ही जगातील सर्वोत्कृष्ट रॉकेट/क्षेपणास्त्र वेधक प्रणाली (इंटरसेप्टर सिटीम) आहे. या लढ्यात हमास/पीआयजेनी इस्रायलवर डागलेल्या हजारो रॉकेट्स/ क्षेपणास्त्रांपैकी केवळ ३७८ रॉकेट्स/क्षेपणास्त्र आपल्या लक्ष्यापर्यंत पोचू शकली. आयडीएफनुसार, आयर्न डोम रॉकेट/क्षेपणास्त्र वेधक प्रणाली ९० टक्के यशस्वी (९०% सक्सेस रेट) ठरली आहे.पण ब्रॉक युनिव्हर्सिटी,अमेरिकेतील मधील प्रोफेसर मायकेल आर्मस्ट्रॉंग यांनी प्रसिद्ध केलेल्या “नॅशनल इंटरेस्ट अनॅलिसिस” या अहवालानुसार, इस्रायली रडार प्रणालीला चकमा देण्यासाठी, या वेळी पॅलेस्टिनियनांनी अतिशय कमी विक्षेप मार्गानी (व्हेरी लो ट्रॅजेक्टरी) उड्डाण करणारी रॉकेट्स/क्षेपणास्त्र, प्रचंड मोठ्या प्रमाणात डागली (सॅच्युरेशन स्ट्राईक) आहेत. हे पाहता, २०१४च्या लढ्यात,हमासच्या कमी पल्ल्याच्या ७०० रॉकेट्स/क्षेपणास्रांसमोर फारशी यशस्वी न झालेली आयर्न डोम रॉकेट/क्षेपणास्त्र वेधक प्रणाली या वेळी इतकी प्रभावशाली कशी झाली हे अगम्य आहे.
प्रत्येक आयर्न डोम लॉंचरमधे २० टिमीर इंटरसेप्टर रॉकेट्स/क्षेपणास्त्र असतात. चार लॉँचर्सची एक बॅटरी असते. म्हणजे एकावेळी एक बॅटरी एका मिनिटात ८० रॉकेट्स/क्षेपणास्त्र डागू शकते. इस्रायलपाशी अशा किती आयर्न डोम बॅटरीज आहेत या बद्दल संरक्षणतज्ञांमधे मतभेद आहेत. ही संख्या २० ते ४५च्या दरम्यान असावी. भारतीय मापदण्डानुसार,या पैकी ५० टक्केच कार्यरत (ऑपरेशनल) असतील अस मानल तरी एका वेळी किमान ८००/१६०० वेधक रॉकेट्स/क्षेपणास्त्र डागण्याच्या इस्रायली क्षमतेला नजर अंदाज करता येत नाही.एकाच वेळी,खूप मोठ्या संख्येत येणाऱ्या रॉकेट्स/क्षेपास्त्रांना पूर्णतः ध्वस्त करण्यासाठी इस्रायलनी २०१८मधे,आयर्न डोमच्या जोडीला आयर्न बीम ही लेझर एयर डिफेंस सिस्टीम तैनात केली.आयर्न डोमनी मोकळ्या सोडलेल्या जागांना (व्हेकन्ट गॅप्स) ही वेधक प्रणाली पूर्णत्व (शोअर अप लिमिटेशन्स) देते. या वेळी हमास/पीआयजेच्या रॉकेट/क्षेपणास्त्र हल्ल्यात इस्रायलचा इतक कमी नुकसान झाल याच कारण हेच आहे.पण आयर्न डोम आणि आयर्न बीम या प्रणाल्यांच्या सांगडीची खरी कसोटी या वेळी सुद्धा लागली नाही अस संरक्षणतज्ञांच मत आहे.
जगातील सर्व मुस्लीम राष्ट्रांनी पॅलेस्टिनला आणि अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी इस्रायलला सर्वंकष पाठींबा दिला आहे.१२ मे,२०२१ला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनी याची पहिल्यांदा दखल घेतली. हा लढा थांबवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी १७ मे,२०२१ला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची चौथी बैठक झाली. मध्यपूर्वेत इस्रायल पॅलेस्टिनमधे सुरू असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी एका आठवड्यात आणलेल्या तीन ठरावांप्रमाणेच अमेरिकेनी या ठरावावर सुद्धा,चौथ्यांदा व्हेटोचा प्रयोग केला. इस्रायल पॅलेस्टिन प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी,चीननी परत एकदा “टू स्टेट सोल्युशन” प्रस्ताव पुढे केला.हा प्रस्ताव; भिन्न भाषा व संस्कृती असणाऱ्या इस्रायल व पॅलेस्टिनमधील पूर्वापार चालत आलेल्या संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठी या दोघांना वेगवेगळे भूभाग देण्यासंबंधी आहे. तेल अविव्हला संपूर्ण सुरक्षा देत ज्यूंसाठी वेगळा आणि त्याच्याच जोडीला पॅलेस्टिनियनसाठी वेगळा भूभाग देणाऱ्या या योजनेला अमेरिका व संयुक्त राष्ट्र संघाचा पूर्ण पाठींबा आहे.टू स्टेट सोल्युशन अमलात आणल्यास; हमास/पीआयजे भविष्यात संपूर्ण वेस्ट बँकचा ताबा घेतील या इस्रायली आणि आपण असलेल्या वेस्ट बॅँकवर इस्रायल पुढेमागे पूर्ण कबजा करेल या हमास/ पीआयजेला वाटणाऱ्या भीतीला पूर्ण विराम मिळेल.धार्मिक दृष्ट्या दोघांसाठी अती पवित्र असलेल्या जेरुसलेमचा पूर्व भाग पॅलेस्टिनला व पश्चिम भाग इस्रायलला देण्यात येईल.दोघांनाही जेरुसलेम हीच राजधानी हवी आहे. पण इस्रायलमधे ख्रिश्चन जननसंख्या नगण्य असली तरी,जेरुसलेम हे शहर ख्रिश्चनांसाठीही तेवढच श्रध्येय असल्यामुळे जेरूसलेमची ताबेदारी हा अतिशय किचकट आंतरराष्ट्रीय प्रश्न बनला/झाला आहे.
यामुळे,मध्यपूर्वेतील अशांततेववर कोणता उपाय आहे हा प्रश्न उभा राहतो.अमेरिका व पाश्चिमात्य देश,अरब नेतृत्व आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांच्या विंनतीला मान देऊन हमास/पीआयजे व इस्रायल युध्द विरामाला तयार होतील की हा संघर्ष अजूनच चिघळत जाऊन तीव्र होईल आणि इस्रायलमधे अरब ज्यू आंतरिक गृह युद्ध सुरू होईल हे तर येणारा काळच सांगेल. कदाचित ही दोघांमधील तिसऱ्या इंतिफदाची (इस्रायलला घुसळून काढण्याची प्रक्रिया) सुरवातही असेल ज्यात कोणा एकाची शक्ती/ताकद संपेपर्यंत लढा सुरूच राहील.इस्रायल हमासच किती नुकसान करू शकतो आणि/किंवा हमास इस्रायलच्या आर्टिलरी/हवाई हल्ल्याचं किती नुकसान झेलू शकतो यावर देखील युद्ध बंदीच भवितव्य अवलंबून आहे. हमासच नेतृत्व गाझाच्या नागरी इलाक्यात लपून बसलं आहे. त्यांना मारण्यासाठी इस्रायलला लवकरच नागरी ठिकाणांवर हल्ले करावे लागतील. तो नागरी संहार जगाला कितपत ग्राह्य होईल या वरही युद्धबंदीच भवितव्य ठरेल. सुत्रांनुसार, २२/२३ मे,२१पर्यंत युद्धबंदी होईल. इस्रायलनी हमासवरील हल्ले थांबवावे ही हमासची तर हमासनी टनेल खोदण व इस्रायलमधील हिंसक निदर्शन बंद करावी ही इस्रायलची मागणी आहे.
भारत,चीन व रशियानी दोघांनाही संयम बाळगण्याचा सल्ला दिला. भारतीय राजदूत टीएस तिरुमूर्ती यांनी त्यांच्या भाषणातील एकाच वाक्यात अल अक्सा मशीद आणि टेंपल माउंटचा उल्लेख करून भारतीय निपक्षपातीपणा उजागर केला.१९९२ला सांधण्यात आलेले भारत व इस्रायलमधील राजनीतिक/सामरिक/आर्थिक संबंध,आजमितीला खूप विस्तारले आहेत.अस असतांनाही भारतानी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत इस्रायलची पाठराखण तर केली नाहीच उलट हमासची सुप्त भलावण केली अस इस्रायलच मत आहे.त्यामुळे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी त्यांना पाठींबा देणाऱ्या राष्ट्रांचे आभार मानतांना भारताच नाव घेतल नाही.इस्रायल पॅलेस्टिनमधे जे सामरिक संतुलन आहे तेच भारत व पाकिस्तानमधे आहे. हमास जे वेस्ट बँक/गाझा स्ट्रीपमधे करतो आहे तेच पाकिस्तान, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मिरमधे करतो आहे. चीन भारताच्या उत्तरेस व पाकिस्तान पश्चिमेस दबा धरून संधीची वाट पाहताहेत.प्रत्यक्ष युद्ध न छेडता पाकिस्तान चीनच्या पाठिंब्यानी भारतावर रॉकेट्सचा मारा करू शकतो. काश्मिर प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्ताननी हमास सारख पाऊल उचलाव अशी मागणी पाकिस्तानच्या मंत्र्यांनी केली आहे.चीनकडे त्याची स्वतः:ची तर पाकपाशी भरमसाठ शॉर्ट रेंज चीनी रॉकेट्स/क्षेपणास्त्र आहेत.मात्र मागील सहा वर्षांपासून भारत रशियन एस ४०० क्षेपणास्त्र/रॉकेट वेधक प्रणालीची खरेदी करतोच आहे.दुखा:त सुख म्हणजे रॅफेल विमान भारतात दाखल होताहेत. तीच काळ्या ढगांची रुपेरी किनार आहे.युद्ध/चकमकी/लढे, केवळ इच्छेवर जिंकल्या जात नाहीत,पोटाला चिमटा काढून युद्ध सज्ज बनाव लागत.हे आपल्या प्रश्नाला कळेल तो सुदिन म्हणायचा.

 १६,भगवाघर कॉलनी,धरमपेठ,नागपूर,१० : ९४२२१४९८७६/abmup ५४gmail.com.