चित्ररथ व कला पथकाद्वारे “कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती महाभियान”

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9400*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

141

चित्ररथ व कला पथकाद्वारे “कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती महाभियान”

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपुर– कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजने अंतर्गत  भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालय, प्रादेशिक लोक संपर्क  ब्युरो, पुणे , गीत व नाटक विभाग( महाराष्ट्र व गोवा ) तर्फे कोरोना विषयी “कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती महाअभियान” अंतर्गत ग्रामीणस्तरावर जनजागृती व्हावी ह्याकरिता असर फाऊंडेशन  भंडारा तर्फे कुही तालुक्यातील देणी  गावात 21 मे 2021  रोजी जनजागृती करण्यात आली .  सदर कार्यक्रमास श्री मधुकर कडु सामाजिक कायर्कर्ता श्री.तुळशीराम मेंढे  उपसरंपंच श्री महल्ले तसेच गावातील नागरिक उपस्थित होते . या प्रसंगी  असर फाऊंडेशन  भंडाराचे वैभव कोलते , दिपक तिघरे, विक्रम फडके लोककलावंतांनी   लोककले आणि  बहु माध्यम प्रदर्शनी द्वारे माहिती रथावरुन जनप्रबोधन केले . तसेच  या अभियाना अंतर्गत  नागपूर जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर, हिंगणा, ऊमरेड, कुहि आणि भिवापूर तालूक्यात राष्ट्रभाषा परिवार सामाजिक सांस्कृतिक संस्था आणि रंगधुन कला मंच, नागपुर  चे लोककलावंत लोककले द्वारे लसीकरणा बाबत महिती सोबत मास्क वापरने , हात धुने ,सेनिटयाजर चा वापर करने आणि सामाजिक दूरी ठेवणया  बद्दल जनप्रबोधन करण्यात आले होते . सदर अभियान क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो , नागपुरचे संजय तिवारी, संजीवनी निमखेड़कर  ह्यांचे देखरेखी खाली राबविल्या जात आहे.