Home आध्यात्मिक अक्षयतृतीया निमित्त आयोजित विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन सामूहिक नामजप यज्ञ साप्ताहाला’ जिज्ञासू भाविकांचा उत्स्फूर्त...

अक्षयतृतीया निमित्त आयोजित विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन सामूहिक नामजप यज्ञ साप्ताहाला’ जिज्ञासू भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9394*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

65 views
0

अक्षयतृतीया निमित्त आयोजित विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन सामूहिक नामजप यज्ञ साप्ताहाला’ जिज्ञासू भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

 

 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर –  अक्षयतृतीया या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या सणाचे औचित्य साधून विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन सामूहिक नामजप यज्ञ साप्ताह’ चे सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले . १२ मे ते १८ मे २०२१ या कालावधीत संपन्न झालेल्या या सामूहिक नामजप यज्ञाला जिज्ञासू भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सप्ताहात साधनाविषयक विविध विषयांवर  उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच १५ मिनिटे सामूहिक नामजपही करण्यात आला. या कार्यक्रमाचा लाभ विदर्भातून १५०० हून अधिक भाविक जिज्ञासूंनी प्रतिदिन घेतला.

या काळातील पहिल्या व शेवटच्या दिवशी सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांनी अनुक्रमे साधनेचे महत्त्व आणि  स्वभावदोष अन् अहंनिर्मूलन प्रक्रिया या विषयांवर मार्गदर्शन केले.

शिल्पा पाध्ये यांनी दानाचे महत्त्व, सौ. पूनम ढाले यांनी दत्त देवतेच्या नामाचे महत्त्व, सौ स्नेहल कोहपरे यांनी नामजपाने होणारे लाभ, श्री पराग बिंड यांनी प्रार्थना व कृतज्ञतेचे महत्त्व, सौ शुभांगी कुलकर्णी यांनी भावजागृतीचे प्रयत्न आणि सौ मंगला दर्वे यांनी सत्संगाचे महत्त्व कथन केले. कु. अवंती उरकुडे, सौ. शीतल चौधरी, सौ केतकी पोळके, श्रीमती मनीषा शंभरकर, कुमारी स्नेहल कांबळे, सौ. प्रीती नागपुरे आणि सौ. दीपाली सिंगाभट्टी यांनी सूत्रसंचालन केले.