Home Breaking News पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन

पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9389*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

69 views
0

पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :डेहराडून-चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे. कोरोनामुळे त्यांच्यावर एम्स ऋषिकेशमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पर्यावरण आंदोलने आणि संघटनांचे मोठं नुकसान झाले आहे. ८ मे २0२१ रोजी त्यांना कोरोना झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर उपचारासाठी त्यांना एम्स ऋषिकेशमध्ये दाखल करण्यात आले होते. पर्यावरणवादी सुंदरलाल यांना कोरोनासोबत निमोनियाही झाला होता. त्यात त्यांना मधुमेह असल्याने उपचारादरम्यान अनेक अडचणी येत होत्या. तसेच त्यांची आॅक्सिजन लेव्हल ८६ वर आली होती. यासाठी रुग्णालयातील डॉक्टर मधुमेह आणि आॅक्सिजन लेव्हल संतुलित करण्यासाठी शथीर्चे प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
पर्यावरणवादी पद्मभूषण आणि स्वातंत्र्यसैनिक सुंदरलाल यांचा जन्म जानेवारी १९२७ला टिहरी जिल्ह्यातील मरोडा गावात झाला होता. त्यांचे वडील अंबादत्त बहुगुणा टिहरीत वनाधिकारी होते. सुंदरलाल हे १३ वर्षांचे असताना शहीद श्रीदेव सुमन यांच्या संपर्कात आले आणि तिथून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी १९७३ साली चिपको आंदोलनाला सुरुवात केली होती. गडवाल हिमालयात वृक्षतोडीविरोधातील आंदोलनाचा मोर्चा त्यांनी सांभाळला होता. गौरा देवी आणि अन्य साथीदारांसह त्यांनी चिपको आंदोलन सुरु केले.