
मनपा अधिका-यांच्या फोटो सेशन विरोधात आप ने जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधिक्षक यांना केली तक्रार
विदर्भ वतन, चंद्रपूर : आम आदमी पार्टी शिष्टमंडळाने मा. जिल्हाधिकारी व अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी चंद्रपूर व मा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तक्रार दिली दिनांक 18/5/2021 ला चंद्रपूर मनपा आयुक्त,महापौर, उपमहापौर,स्थायी समिती सभापती, आरोग्य अधिकारी ,उपायुक्त,व नगरसेवक,तसेच अन्य माजी नगराध्यक्ष, माजी उपाध्यक्ष यांनी आसरा कोविड दवाखान्याचे उदÑघाटन करून नंतर त्याचे मास्क न घालता, सोशल डिस्टेन्स न पाळता फोटो सेशन केले व कायदा कलम 144, 188 चे उल्लंघन करून कोरोना महामारीस पसरविण्याचे गंभीर लाजिरवाणे कार्य केले. ही जनतेची फसवणूक आहे. कारण बिना मास्क घालता बाहेर पडल्यास दंड लागतो तर यांना हा दंड का नाही. तसेच जमावबंदी असतांना 41 लोकांना जमा करून जवळ जवळ बसून फोटो काढने हा आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे गुन्हा आहे याची तक्रार दि.18/5/21 रोजी रामनगर पोलीस स्टेशन येथे आप चे माजी जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यानी केली आहे. कायदा हा सर्वांसाठी एकच तर या पदाधिका-यांवर तात्काळ कार्यवाही व्हावयास पाहिजे या करिता ही तक्रार देण्यात आलेली आहे . प्रशासना कडून काय कारवाही होते याची प्रतीक्षा आहे. तक्रार करते वेळी आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष सुनिल देवराव मुसळे जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी सहसचिव सूर्यकांत चांदेकर सल्लागार अँड.राजेश विराणी तसेच ईतर पदाधिकारी उपस्थित होते.

