Home Breaking News नागपूर सुपर स्पेशालिटी दवाखान्यात टेस्ट रिपोर्टमुळे कोरोना पसरण्याची भीती

नागपूर सुपर स्पेशालिटी दवाखान्यात टेस्ट रिपोर्टमुळे कोरोना पसरण्याची भीती

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9378*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

144 views
0

नागपूर सुपर स्पेशालिटी दवाखान्यात टेस्ट रिपोर्टमुळे कोरोना पसरण्याची भीती

विदर्भ वतन, नागपुर: शहरातील सर्वात मोठे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार इस्पितळात अशा काही घटना समोर येत आहेत ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग फैलावण्याची भीती निर्माण झाली आहे. या इस्पितळात रोज शेकडो रुग्ण रक्त तपासण्याकरिता येतात. त्यांची रक्त चाचणी रिपोर्टचा गठ्ठा एका टेबलावर ठेवण्यात येतो. जिथे सेनिटाजरची पण व्यवस्था नाही. रिपोर्ट शोधून काढून देण्याकरिता कोणीही कर्मचारी नाही. टेबल्यावर ठेवलेल्या गठ्ठ्यातून रुग्णाला स्वत: आपली रिपोर्ट शोधावी लागते. असे शेकडो रुग्णांचे हात कागदी रिपोर्टला लागतात. या शेकडो रुग्णात दोन चार जर कोरोना बाधित असू शकतात. त्यामुळे कोरोना पसरण्याची भीती आहे. अशावेळी इस्पितळ प्रशासनाने घबरदारी घेणे गरजेचे आहे.