तीन कुटुंबीयांचे आमदार पारवेंनी स्वीकारले पालकत्व

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9772*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

266

तीन कुटुंबीयांचे आमदार पारवेंनी स्वीकारले पालकत्व

– तीनही कुटुंबाच्या कर्त्या पुरुषांचे कोरोनाने झाले निधन

विदर्भ वतन, उमरेड : उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांनी गुरुवारी (२0 मे) उमरेड येथे येथील कोरोनामुळे मृत झालेल्या गरीब कुटुंबीयांना भेट दिली. दगावलेल्या प्रत्येक कुटुंबीयांच्या अडिअडचणी समजून घेतल्या. रेल्वे स्टेशन झोपडपट्टी उमरेड येथे भेट देत कुटुंबियांचे सांत्वन करीत मी भाऊ, तुमचा मुलगा म्हणून नेहमी तुमच्या सोबत आहे. कोणतीही अडचण असल्यास मला सांगा, अशा शब्दात पीडित कुटुंबीयांना अशा कठीण प्रसंगी धीर देत त्यांना आर्थिक मदत केली. तसेच भविष्यातील अडअडचणीत सदैव मी तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून आल्या सोबत असल्याचा त्यांना विश्वास दिला.
भेट दिलेल्या कुटुंबीयांमधील देवकाबाई भारत मून यांचा मुलगा २८ वषार्चा होता. तर पत्नी ७ महिन्यांची गरोदर आहे. लीला जयवंत रुईकर यांचे पती ३५ वर्षांचे होते. एक पाच वषार्चा मुलगा व तीन वर्षांची मुलगी आहे. तर जयमाला कृष्णा मरघटे यांचे पतीसुद्धा ३५ वर्षांचे होते. त्यांना दोन मुलं आहेत. कुटुबांचा कर्ता पुरुष गेल्याने पीडित कुटुंबांना जगावे कसे? हा प्रश्न पडला आहे. अशातच उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांनी त्यांच्या राहत्या घरी भेट देत त्यांना आर्थिक मदतीसह सात्वन केल्याने आमदाराच्या रुपाने पीडित कुटुंबीयांना भक्कम आधार मिळाला असल्याच्या गावक-यांच्या प्रतिक्रिया होत्या. याप्रसंगी नगरसेवक महेश भुयारकर, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष जितेंद्र गिरडकर, गुणवंता मांढरे, सुरेश वाघमारे, रितेश राऊत, मंगेश महाले, भूमिका लोणारे आदिंची उपस्थिती होती.