पत्रकाराच्या घरावर भाजी विक्रेत्यांचा हल्ला

300

राधाकिसन चुटे जिल्हा प्रतिनिधी, गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम पंचायत सौन्दड येथील रहिवासी पत्रकार बबलू मारवाडे यांच्या घरावर स्थानिक भाजी विक्रेत्यांनी दांडे घेऊन हल्ला चढविला आहे, यात महिलांना समोर करण्यात आले आहे. त्यातच जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे. सविस्तर वृत्त असे की, सध्या कोरोना महामारी संपूर्ण जगात चालू आहे, अश्यात सौन्दड गावात सुद्धा मोठ्या प्रमाणे कोरोना बाधित लोकांचा आकडा समोर आला आहे़ त्यातच 10 ते 12 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, असे असताना गावात कंटेंमेंट झोन दोन वेळा लावण्यात आले़ सध्या गावात कंटेंमेंट झोन आहे.
त्यातच आठवड्यात 2 वेळा गुरुवारी आणि सोमवारी असे दोन दिवस भाजी विक्रीकरिता दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत लावण्याची परवानगी बैठकीच्या माध्यमातून देण्यात आली.
भाजी विक्रेत्यांनी नियमांचे पालन करून भाजी विक्री करणे बंधनकारक आहे़ मात्र तसे होत नाही़ यावर नागरिकांची गर्दी असलेले फोटो सहित बातम्या प्रकाशितही करण्यात आल्या़ ज्यावर प्रशासन कार्यवाई करेल आणि गावात वाढत्या गर्दीला व कोरोनाला नियंत्रणात आणता येईल या हेतूने बातम्या लावण्यात प्रकाशित करण्यात आल्या़यावर प्रशासनही नियोजन शुन्य असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले़ गावात वाढत्या कोरोना महामारीला स्थानिक प्रशासन जबाबदार आहे असाही सुर उमटला होता़ त्यामुळे वारंवार बातम्या लावून प्रशासनाला जागे करण्याचे काम पत्रकाराने केले आहे.
त्याच वृत्तांच्या अनुषंगाने स्थानिक प्रशासन व पोलिस विभागाने भाजी विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. भाजी विक्रेत्यांवर कार्यवाई करतांना स्थानिक प्रशासनाने पत्रकाराचे नाव पुढे करून कारवाई केली असे भाजी विक्रेते सांगतात़ त्यामुळे पत्रकाराच्या नावाने गावातील भाजी विक्रेते भडकले आणि घरावर हल्ला केला़ एकंदरीत स्थानिक प्रशासनाच्या कामचुकार धोरणामुळे गावात कोरोना वाढला आहे, त्यामुळे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहजे असे मत पत्रकार मारवाडे यांनी व्यक्त केले आहे. तसेच घरावर हल्ला केल्यानंतर स्थानिक पोलिसांनी वेळीच येऊन स्थिती नियंत्रणात आणली़ पत्रकार मारवाडे यांना व परिवाराला काही झाल्यास सर्वस्वी जबाबदार प्रशासन व सरपंच, सरपंचासह भाजी विक्रते राहतील याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले़ या सर्व बाबींची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक बनकर यांना देण्यात आली आहे.