Home Breaking News रुग्णवाहिका नाल्यात कोसळल्याने तीन जखमी

रुग्णवाहिका नाल्यात कोसळल्याने तीन जखमी

138 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल, गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील देवरी तहसील अंतर्गत येणा-या घोनाडी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका ही गोंदिया वरून औषध घेऊन देवरीकडे जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण रुग्णवाहिका सुटले व रुग्णवाहिका गोंदिया गोरेगाव रस्त्यावर कारंजा-ढीमरटोली मार्गावर असलेल्या नाल्यात अनियंत्रित होऊन कोसळली. या घटनेत रुग्णवाहिकेत बसलेले तीन लोक जखमी झाले आहे. ज्यामध्ये रुग्णवाहिका चालक मंगेश हिंगे, कर्मचारी बलिराम हेला व एका महीलेचा समावेश आहे. तिन्ही जखमींना गोंदिया मेडीकल कॉलेज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. घानोडी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका क्र. एम एच -३५/डी-२८९ ने औषध घेण्यासाठी गोंदियाला आली व औषध घेऊन गोंदिया वरून घोणाडी देवरीकडे गोंदिया गोरेगाव मार्गाने जात असताना ही घटना घडली.