राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोरोनाने निधन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9336*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

124

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोरोनाने निधन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : जयपूर – देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. सर्वसामान्यांसह दिग्गजांनाही कोरोनाचा फटका बसत आहे. कोरोनामुळे दररोज हजारोजण आपला जीव गमवत आहेत. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचेही कोरोनाने निधन झाले आहे. बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहाडिया यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज २० मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. दुपारी 12 वाजता माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांच्या निधनामुळे शोकसभा होणार आहे. पहाडिया यांच्या सन्मानार्थ राज्यात आज शोक दिवस पाळण्यात येणार असून राष्ट्रीय ध्वज झुकलेला असेल, तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सुट्टी असेल. त्याचबरोबर पहाडिया यांच्यावर राज्य सन्मान देऊन अंत्यसंस्कार करण्यात येतील.