लेप्टोस्पायरोसिस – पावसाळ्यात उद्भवणारा जीवघेणा आजार -मुंबईत लेप्टोस्पायरोसिसचे 5 बळी

विदर्भ वतन विशेष

लेप्टोस्पायरोसिस हा जीवाणूंचा संसर्गजन्य असा आजार असून तो उंदरांचे मुत्र यांचा संपर्क अस्वच्छ पाण्याशी आल्याने व त्याच्यात मानवाचा संपर्क झाल्याने होऊ शकतो. लेप्टोस्पायरोसिसचा आजार होण्याचे प्रमुख कारण हे जीवाणू असते. उंदरांच्या मूत्रामध्ये लेप्टोस्पायरोसिसच्या जीवाणूंचा समावेश असू शकतो. उंदरांचे मूत्रविसर्जन पाणी,डबके व नद्यांना अधिक दूषित करतात.या पाण्याशी मानवाचा संपर्क आल्यास त्वचेमध्ये असलेल्या भेगांमधून हे जीवाणू मानवांवर प्रभाव पाडू शकतात. लेप्टोस्पायरोसिस हा संसर्ग उंदीर किंवा वन्यप्राण्यांच्या मुत्रमार्गामध्ये असतो.त्यांचे मूत्र शेतातील पाणी,पुराचे पाणी किंवा पावसाचे पाणी दूषित करते व याद्वारे या रोगाचा प्रसार माणसांमध्ये होऊ शकतो. लेप्टोस्पायरोसीसची लक्षणे व उपचार भारतात संसर्गाचा प्रसार पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचल्यानंतर दिसून येतो.पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचण्याचे मुख्य कारण म्हणजे अपुरी सांडपाणी व्यवस्था.या संसर्गाचा प्रभाव शेतात विशेष करून भातशेती करणार्‍या शेतकर्‍यांवर होऊ शकतो. लेप्टोस्पायरोसिसच्या बाबतीत बरेचदा लक्षणे ही फ्ल्यू सारखी असतात,ज्यामध्ये थंडी भरून येणे,डोके दुखणे,स्नायू दुखणे यांचा समावेश आहे. लेप्टोस्पायरोसिसचा उपचार हा या आजाराच्या तीव्रतेप्रमाणे डॉक्टर्स ठरवितात.बरेच दिवस न जाणारा ताप,अंगदुखी हे लेप्टोस्पायरोसिसची सामान्यत: दिसून येणारी लक्षणे आहेत.बर्याच केसेसमध्ये रूग्णांना कावीळ,मुत्रपिंड निकामी होणे किंवा फुप्फुसामधून रक्तस्त्राव अशा समस्या उद्भवू शकतात.अशा रूग्णांना डायलिसिस किंवा मेकॅनिकल वेंटिलेशन लागू शकते. चिखल, माती व पावसाच्या पाण्यांत काम करताना त्यातून जीवाणूंचा प्रवेश होण्याचा धोका असतो.त्यामुळे पावसाळ्यातील साचलेल्या पाण्यात खेळणे किंवा वावरणे टाळावे.इतर वेळेस पाण्यात उतरताना वॉटरप्रुफ ड्रेसिंग,प्रतिबंधात्मक ठरेल.तसेच दुषित पाण्याशी संपर्क आल्यावर स्वच्छ पाण्याने पाय धुणे उपयोगी ठरेल.पावसाळ्यात पादत्राणे न घालता बाहेर जाणे किंवा चालणे टाळावे.पाऊस सुरू असल्यास किंवा पाणी मोठ्या प्रमाणावर साचले असल्यास बुट व त्यापासून संरक्षणासाठी योग्य कपडे घालावे.विशेष करून शहरात या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी योग्य सांडपाणी व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत असणे गरजेचे आहे

डॉ.रमण गायकवाड,

कन्सल्टंट ऑफ इन्फेकशियस डिसिजेस सह्याद्रि हॉस्पिटल्स

You missed