भाजप पदाधिकार्‍याची पत्नी, मुलीसह आत्महत्या

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9310*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

181

भाजप पदाधिकार्‍याची पत्नी, मुलीसह आत्महत्या

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था-जळगाव- जळगाव जिल्हय़ातील धरणागाव तालुक्यात असलेल्या भोद गावाचे रहिवाशी, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष, एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक राजेंद्र रायभान पाटील यांनी पत्नी आणि मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिंदखेडा तालुक्यातील दभाशी नजीकच्या पुलावरून त्यांनी तापीनदीत उडी घेवून आत्महत्या केली आहे. तिघांचे मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात आले आहेत. राजेंद्र रायभान पाटील (५४), पत्नी वंदनाबाई राजेंद्र पाटील (४८), मुलगी ज्ञानल पाटील (२१) अशी मृतांची नावे आहेत.
जळगाव जिल्हय़ातील धरणगाव तालुक्यातील भोद येथील राजेंद्र रायभान पाटील, पत्नी वंदनाबाई राजेंद्र पाटील व मुलगी ज्ञानल राजेंद्र पाटील हे तिघे जण टाटा इंडीका (एमएच-१९/एपी-१0९४) गाडीने सोमवारी (दि.१७) सकाळी अमळनेर तालुक्यातील भरवस या सासरवाडीच्या गावाला गेले होते. येथे र्शाध्दाचा कार्यक्रम असल्याने राजेंद्र पाटील पत्नी व मुलीसह सासरवाडीला आले होते. दुपारी साडेतीन वाजता ते घरी भोद येथे येण्यासाठी निघाले. मात्र, ते भोदला पोहचलेच नाही. दरम्यान, सायंकाळी त्यांची गाडी शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावानजीक तापी नदीवर असलेल्या पुलावर लागलेली दिसली. त्यानतंर मंगळवारी (दि.१८) दुपारी ४ वाजता एक पुरूषाचा मृतदेह तापीत तरंगतांना परिसरातील नागरिकांना दिसला. जळगाव जिल्हय़ाचा क्रमांक असल्याने जळगावातील गृपमध्ये याबाबत चर्चा सुरू असतांना जिल्हा बँकचे संचालक संजय पवार यांनी ही गाडी ओळखल्यानंतर याबाबत तालुक्यात चर्चा सुरू झाली. शेतकी संघाचे अध्यक्ष रमेशबापू पाटील यांनी भोद गावी धाव घेतली. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. आबा पाटील देखील माहिती मिळताच त्यांनीही रात्री घटनास्थळी धाव घेतली. तोपयर्ंत राजेंद्र पाटील यांच्यासह त्यांची मुलगी ज्ञानल हिचाही मृतदेह तरंगतांना आढळून आला. मात्र, रात्र झाल्यामुळे या दोघांचे मृतदेह बाहेर काढता आले नाहीत. सकाळीच हे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. त्यानतंर सकाळी पत्नी वंदनाबाई यांचा देखील मृतदेह तरंगताना आढळला. तिन्ही मृतदेह बाहेर काढून शिरपूर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.