खरीप हंगामात शेतकर्‍यांना कुठलीही अडचण येणार नाही, याची खबरदारी घ्या-आमदार राजू पारवे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9306*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

280

खरीप हंगामात शेतकर्‍यांना कुठलीही अडचण येणार नाही, याची खबरदारी घ्या-आमदार राजू पारवे

पंचायत समिती कुही येथे आढावा बैठक

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, कुही –शेतकर्‍यांना कोरोना काळात खरीप हंगामात कुठलीही अडचण येणार नाही याची खबरदारी घेत शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत करा व बी-बियाण्यांबाबत योग्य मार्गदर्शन करा, अशा सूचना आमदार राजू पारवे यांनी अधिकार्‍यांना दिल्या.
आमदार राजू पारवे यांनी पंचायत समिती कुही येथे बुधवारी (१९ मे) कृषी विभाग खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक घेतली, याप्रसंगी विविध बाबीचा आढावा घेऊन त्यांनी मार्गदर्शन केले. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत बांधावर बियाणे व खते पुरवठा करण्याबाबत मोठय़ा प्रमाणावर मोहीम राबविण्यात यावी, बीजप्रक्रिया मोहीम राबवून बीज प्रक्रिया करण्याबाबत शेतकर्‍यांना जागृत करावे, खत व बियाणे काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई करावी, फळबाग क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करावेत, ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्याबाबत गट विकास अधिकारी यांना सूचना दिल्या. तसेच शेतकर्‍यांना पीक कर्ज वेळेत मिळण्याकरिता बँक अधिकारी यांनी सामाजिक बांधिलकी ठेऊन काम करावे, याबाबत कामचुकार अधिकारी यांची गय केली जाणार नाही, असा इशारा ही देण्यात आला. प्रत्येक बँकनी बँकेसमोर पेंडाल टाकावे, बसण्याची व्यवस्था करावी व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी, असे आदेशसुद्धा अधिकार्‍यांना दिले.
यावेळी सभापती अश्‍विनी शिवनकर, उपसभापती वामन श्रीरामे, जि. प. सदस्य मनीषा फेंडर, प्रमिला दंडारे, कविता साखरवाडे, पं. स. सदस्य मंदा डहारे, वंदना मोटघरे, ईस्तारी तळेकर, मनोज तितरमारे, अरुण हटवार, उपास भुते, हरिष कढव, संदीप खानोरकर, विलास राघरेते, सुनील किंदर्ले, परमानंद शेंडे, तहसीलदार बाबाराव तिनघसे, गटविकास अधिकारी मनोज हिरूडकर, सहायक निबंधक शिवप्रसाद पारवे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप पोटदुखे, अनिल सोनकुसरे व मोठय़ा संख्येने शेतकरी उपस्थित होते.