बनावट लायसंस बनविणारा पोलिसांच्या जाळ्यात

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9302*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

222

बनावट लायसंस बनविणारा पोलिसांच्या जाळ्यात

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, मौदा – शहरात एक जण बनावट वाहन चालविण्याचे लायसन्स अवघ्या १५ मिनिटात तयार करून देतो, अशा खात्रीशिर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा नागपूरचे पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या नेतृत्वात पथकाने सोमवारी (१७ मे) संबंधीत बाब मोटार परिवहन विभाग यांच्याशी संबंधित असल्याने संयुक्तीकरित्या मौदा येथील नवाब फोटो स्टुडिओ येथे कारवाई करून आरोपीला अटक केली. नवाब जमीर बेग (वय ५0, रा. ओमसाईनगर, मौदा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
ग्रामीण भागातील लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचे आधारकार्ड व फोटो घेऊन रुपये ४ ते ५ हजारांमध्ये आरोपी नवाब जमीर फोटो स्टुडिओमध्ये १५ मिनिटाच्या अवधीत बनावट वाहन चालविण्याचा परवाना तयार करून देत होता. आरोपीने यापूर्वी ज्यांना असे परवाने तयार करून दिले आहे. अशांनी पोलिस स्टेशन मौदा येथे त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. आरोपी नवाब फोटो स्टुडिओ येथून वेगवेगळ्या नावाचे बनावट वाहन चालविण्याचे परवान बनवून देत असल्याने स्टुडिओमध्ये बरेच परवाने मिळुन आले. याबाबत विचारणा केली असता आरोपीने समाधानकारक उत्तर दिले नाही. आरोपीच्या ताब्यातून बनावट परवाने तयार करण्याचे साहित्य एकूण कि ंमती ६५ हजार ४0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिस स्टेशन मौदा येथे भादंविचे कलम ४६५, ४६८, ४७१, ४७२ अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलिस मौदा पोलिस करीत आहे. कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक राहल माकणीकर, पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावर यांच्या मार्गदर्शनात पोउपनि नरेंद गौरखेडे, सचिन मत्ते, सफौ लक्ष्मीप्रसाद दुबे, पोहवा विनोद काळे, नापोशि शैलेष यादव, सत्यशिल काठोरे आदींनी केली.