Home Breaking News “करोनातून बरे झालेल्यांना ६ महिन्यांनंतर लस देणं धोकादायक”, IMA नं दिला इशारा!

“करोनातून बरे झालेल्यांना ६ महिन्यांनंतर लस देणं धोकादायक”, IMA नं दिला इशारा!

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9287*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

50 views
0

“करोनातून बरे झालेल्यांना ६ महिन्यांनंतर लस देणं धोकादायक”, IMA नं दिला इशारा!

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली- रखडत का होईना भारतात लसीकरण सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४वयोगटातील नागरिकांनाही लस दिली जात आहे. मात्र,काही ठिकाणी लसींचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरणाला ब्रेक लागला आहे. यातच, केंद्र सरकारने नवे निर्देश जारी केले आहेत. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना सहा महिन्यांनी लस दिली जावी असं केंद्र सरकराने म्हटलं आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयावर इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात देशातील डॉक्टरांची शिखर संस्था IMA नं आक्षेप घेतला आहे. “कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना ६ महिन्यांनतर कोरोनाची लस देणं हे त्यांच्यासाठी धोकादायक आहे. या काळात त्यांना पुन्हा या विषाणूची लागण होऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारने या धोरणाचा पुन्हा विचार करावा”, अशी भूमिका आयएमएचे अध्यक्ष डॉ. जे. ए. जयलाल यांनी मांडली आहे. त्यामुळे करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी नेमकी लस कधी घ्यावी? या मुद्द्यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे.

आयएमएच्या अध्यक्षांनी बुधवारी देशातील लसीकरणाविषयी सविस्तर भूमिका मांडली. तसेच, देशातील सर्व नागरिकांना लवकरात लवकर लस देण्याची गरज देखील त्यांनी व्यक्त केली. “कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना कधी लस दिली जावी, याविषयी दावे-प्रतिदावे सुरू आहेत. पण अशा नागरिकांना लस घेण्यासाठी ६ महिने थांबायला लावणं हे त्यांच्यासाठी धोकादायक असून त्यांना विषाणूची पुन्हा लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे यासंदर्भातल्या धोरणाचा पुन्हा विचार करावा. देशातील सर्व नागरिकांना लवकरात लवकर लसीकरण होईल, असा मार्ग सरकारने शोधून काढावा”, असं ते म्हणाले आहेत. नजीकच्या भविष्यात करोनामुक्त भारत करण्याचं लक्ष्य यामुळे साध्य होऊ शकेल, असं देखील ते म्हणाले.

…तर तिसऱ्या लाटेचा सामना करणं धोक्याचं!

दरम्यान, डॉ. जयलाल यांनी देशात येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण होण्याची गरज व्यक्त केली. “देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. दक्षिणेकडच्या काही राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. अनेक रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा, रुग्णालयात बेड आणि औषधं मिळण्यात अडचणी येत आहेत. मृतांचा आकडा देखील वाढतो आहे. लसीकरण हाच यातला एकमेव मार्ग आहे. दर आपण व्यापक स्तरावर लसीकरण केलं नाही, तर येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेचा सामना करणं सुरक्षित राहणार नाही. घरोघरी लसीकरणाच्या पर्यायावर देखील सरकारने विचार करायला हवा”, असं त्यांनी नमूद केलं.

६० ते ७० टक्के नागरिकांना लसीकरण आवश्यक!

येत्या काही महिन्यांत देशातल्या किमान ६० ते ७० टक्के नागरिकांना लस दिलेली असणं आवश्यक असल्याचं जयलाल यांनी नमूद केलं. “आपण वेगाने लसीकरण करायला हवं. येत्या काही महिन्यांमध्ये आपण ६० ते ७० टक्के नागरिकांना लसीकरण करण्याचं टार्गेट पूर्ण करायला हवं. सध्या फक्त १८.५ कोटी लोकसंख्येला लस देण्यात आली असून भारतानं हर्ड इम्युनिटी निर्माण करण्यासाठी किमान ७० ते ८० कोटी नागरिकांना लसीकृत करणं आवश्यक आहे”, असं ते म्हणाले.