Home Breaking News ‘तौक्ते’नंतर आता ‘Yaas’ चक्रीवादळाचा धोका! ‘या’ राज्यांना इशारा

‘तौक्ते’नंतर आता ‘Yaas’ चक्रीवादळाचा धोका! ‘या’ राज्यांना इशारा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9282*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

187 views
0

‘तौक्ते’नंतर आता ‘Yaas’ चक्रीवादळाचा धोका! ‘या’ राज्यांना इशारा

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – महाराष्ट्र, गोवा, गुजरातला नुकताच ‘तौक्ते’ चक्रीवादळाने तडाखा दिलेला असतानाच आता आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने काही राज्यांमध्ये ‘Yaas’ चक्रीवादळाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या वादळाला ओमानने ‘यस’ हे नाव दिले आहे.

बंगालच्या खाडीत उत्तर मध्यावर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे 23 आणि 24 मे रोजी त्याचे वादळात रुपांतर होणार आहे. हे वादळ तयार झाल्यास त्याला ‘यस’ चक्रीवादळ संबोधले जाईल. 27 ते 29 मे दरम्यान या वादळामुळे लँडफॉल होईल. त्यामुळे अंदमान निकोबार बेट, ओडिशा आणि पश्चिम बंगालला जोरदार फटका बसेल. यावेळी ताशी 140 ते 150 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.