Home Breaking News देहव्यापार अड्डयावर धाड, चार मुलींची सुटका

देहव्यापार अड्डयावर धाड, चार मुलींची सुटका

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/92737*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

164 views
0

देहव्यापार अड्डयावर धाड, चार मुलींची सुटका

विदर्भ वतन, नागपूर : वाठोडा हद्दीत सुरू असलेल्या देहव्यापार अड्डयावर धाड टाकून सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ३ अल्पवयीन मुलीसह एका सज्ञान मुलीची सुटका केली आहे. याप्रकरणी देहव्यापार अड्डा चालविणा-या महिलेविरुद्ध वाठोडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांना वाठोडा हद्दीत अर्चना शेखर वैश्यपायन रा. मोतीलालनगर, ही महिला स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मुलींना पैशांचे आमिष देऊन देहव्यापारास प्रवृत्त करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिस उपायुक्त राजमाने यांनी सामाजिक सुरक्षा पथकाला याबाबात शहानिशा करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे पथकाने खात्री करून सापळा रचला आणि एक बोगस ग्राहक पाठवून धाड टाकली. त्या धाडीत ३ अल्पवयीन मुली आणि एक सज्ञान मुलगी मिळून आल्या. सामाजिक सुरक्षा पथकाने त्या मुलींची तेथून सुटका केली आहे.
आरोपी महिला अर्चना वैशंमपायन रा. मोतीलालनगर हिला तीनही मुली अल्पवयीन असल्याची जाणीव असूनसुद्धा त्यांना पैशांचे आमिष देऊन स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता देहव्यापार करवून घेतला. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये वाठोडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.