Home Breaking News वारकरी संस्था चालकाने ११ वर्षीय मुलावर केले अनैसर्गिक कृत्य

वारकरी संस्था चालकाने ११ वर्षीय मुलावर केले अनैसर्गिक कृत्य

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9262*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

142 views
0

वारकरी संस्था चालकाने ११ वर्षीय मुलावर केले अनैसर्गिक कृत्य

विदर्भ वतन, आळंदी : आळंदी परिसरातील एका वारकरी संस्था चालकाने वारकरी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिवप्रसाद रामनाथ भोकनळ याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी आळंदी परिसरातील श्री माऊली वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ११ वर्षीय पीडित मुलाला वारकरी शिक्षणासाठी आई वडिलांनी पाठवले होते. आरोपी शिवप्रसाद भोकनळ हा मुलांना वारकरी संप्रदायासंदर्भात शिक्षण देत होता. दरम्यान, पीडित मुलाच्या घरी पाहुणे आल्याने त्याला आईने घरी आणले होते. तेव्हा, भोकनळ यांनी पीडित मुलाला तातडीने परत संस्थेत पाठवावे असे सांगितले. यावरून पीडित मुलगा संस्थेत जायचे नाही म्हणून रडायला लागला. आईने मुलाला विश्वासात घेऊन माहिती विचारली असता सदरचा गंभीर प्रकार समोर आला. शिवप्रसादने अनैसर्गिक कृत्य केल्याचे त्या मुलाने आईला सांगितले.
सर्व मुलं हरिपाठ करण्यासाठी जात असतानाच, ११ वर्षीय पीडित मुलाला भोकनळने तुज्याकडे काम आहे असे म्हणून थांबवले. सर्व जण गेल्यानंतर त्याला एका खोलीत नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्यात आले. दरम्यान, पीडित मुलाला याची वाच्यता केल्यास तुला बघून घेईल अशी धमकी देखील शिवप्रसादने दिली. याप्रकरणी आळंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली आहे.