आंबे खाण्याचा नाद जीवावर बेतला,वैनगंगा नदीत डोंगा उलटला

– तीन विद्यार्थिनींचा मृत्यु

विदर्भ वतन,भेंडाळा(चामोर्शी) : आंबे तोडण्यासाठी डोग्यांच्या सहाय्याने वैनगंगा नदीच्या दुस-या काठावर जाणा-या तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १८ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. सोनी मुखरू शेंडे (१३), समृद्धी ढिवरू शेंडे (११), दोघही रा. वाघोली, पल्लवी रमेश भोयर (१५) रा. येवली अशी मृतक विद्यार्थींनीचे नावे आहे. या घटनमुळे वाघोली गावात शोककळा पसरली होती.
कोरोनामुळे सततच्या शाळा बंद राहत असल्याने आणित आता शाळेला सुट्या असल्याने ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांचा कल हा अभ्यासाऐवजी खेळाकडे लागलेला असते. आंबे खाण्याची आवड झाल्याने वाघोली येथील तीन विद्यार्थ्यांनी डोंग्याच्या सहाय्याने दुस-या तिरावर असलेले आंबे तोडण्यावाठी आज दुपारच्या सुमारास जात होत्या. दरम्यान डोंगा खोल पाण्याजवळ गेला असता डोंग्याचा तोल गेल्याने त्याचे नियंत्रण बिघडले आणि डोंग्यावर बसलेल्या सोनी मुखरू शेंडे, समृद्धी ढिवरू शेंडे, पल्लवी रमेश भोयर या तिन्ही विद्यार्थ्यांचा तोल जावून त्या खोल पाण्यात कोसळल्या. तिघींनाही पोहता येत नसल्याने त्यांचा वैनगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. मात्र डोंगा चालवणारा हा कसा बसा पोहून नदीच्या दुस-या काठावर पोहचला. परंतु या तीनही मुलीना तो वाचवू शकला नाही. विशेष म्हणजे मृत झालेली सोनी आणी समृद्धी या सख्या चुलत बहिणी असून पल्लवी ही या दोन मुलींची मेहुणी लागते. सुट्या असल्यामुळे ती मामाच्या गावाकडे आली आली होती.
सोनी मूकरू शेंडे विश्वशांती विद्यालय भेंडाळा येथे आठव्या वर्गात शिकत होती, समृद्धी ढिवरू शेंडे ही गावांतीलच जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चवथ्या वर्गात होती तर पल्लवी रमेश भोयर ही गडचिरोली तालुक्यातील येवली येथील असून ती आपल्या मामाकडे वाघोलीला आली होती. ती या वर्षी इयत्ता दहावीला होती. सदर घटनेमुळे वाघोली गावात शोककळा पसरली होती.
घटनेची माहिती मिळताच चामोर्शीचे तहसीलार सिकतोड व त्यांची चमू, पोलिस निरीक्षक बिपिन शेवाळ, सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, महिला पोलिस उपनिरीक्षक पल्लवी वाघ व त्यांची घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला व शवविच्छेनसाठी चामोर्शी ग्रामीण रुगणालयात पाठविण्यात आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले. घटनेची नोंद चामोर्शी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास चामोर्शी पोलिस करीत आहेत.

You missed