Home Breaking News सिध्दु कोमजवार यांच्या जनसंपर्क कार्यालय व तक्रार निवारण केंद्राचे उद्घाटन

सिध्दु कोमजवार यांच्या जनसंपर्क कार्यालय व तक्रार निवारण केंद्राचे उद्घाटन

0
सिध्दु कोमजवार यांच्या जनसंपर्क कार्यालय व तक्रार निवारण केंद्राचे उद्घाटन

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना नागपूर शहर अध्यक्ष सिध्दु कोमजवार यांचे आशिर्वाद नगर, भारत माता चौक, शिला अपार्टमेंन्ट, प्लाँट नं. 102 येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालय व तक्रार निवारण केंद्राचे उद्घाटन नुकतेच पार पडले़ खा.कृपाल तुमाने व आ.दुष्यंत चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनातून शिवसेना शहर प्रमुख मा.दिपक कापसे, मा.किशोर पराते यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. या कार्यालयातून जनतेच्या समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. तसेच त्या प्रखरपणे व ताबडतोब सोडविण्यात येतील असा विश्वास सिद्धु कोमजवार यांनी यावेळी व्यक्त केला़ कोरोना महामारीच्या काळात सिद्धु कोमजवार यांनी नागरिकांच्या अनेक समस्या सोडविल्या तसेच अनेकांना आपुलकीने मदतीचा हात दिला़ त्यामुळे नागरिकांनी असलेल्या समस्यांसाठी कार्यालयात भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे़