सान्वी बहेकार युसीमासमध्ये चॅम्पियन

332

विदर्भ वतन न्युज पोर्टल, राहुल चुटे आमगाव प्रतिनिधी – गोंदिया येथे विभागीय स्तरावर युसीमास एबेकस व बौद्धिक चाचणी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत गोंदिया तसेच परिसरातील इतर ठिकाणाहूनही विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत भाग घेणाºया स्पर्धकांना स्मृतिचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले. ‘बी’ श्रेणीत पोद्दार इंटरनेशनल शाळेची ३ ºया वर्गाची विद्यार्थीनी सान्वी टेकेश्वर बहेकार हिने बाजी मारली. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. सान्वीने आपले यशाचे श्रेय शिक्षक कमलेश डोमळे,आई वडील व दादाजी कृपाशंकर बहेकार, नानाजी भुरेलाल ठाकरे यांना दिले आहे.