गुन्हे शाखेच्या कारवाईत ९० हजारांच्या मुद्देमालासह टोळीला अटक

195

विदर्भ वतन न्युज पोर्टल, राहुल चुटे आमगाव प्रतिनिधी – गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्थानकाकडे जाणाºया मार्गावर कुंभारटोली परिसरात एकाकी बंद असलेल्या घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी करून निघालेल्या 2 चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने पकडले. सदर चोर संशयास्पद स्थितीत फिरत होते. ही कारवाई आज रविवार, 16 मे रोजी पेट्रोलिंग दरम्यान मध्यरात्री 1.45 वाजता करण्यात आली. तसेच त्यांची चौकशी करून चोरीत सहभागी असलेल्या आणखी 4 आरोपींना सुद्धा पकडण्यात आले.
पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तुम्ही येथे काय करीत आहा, नाव काय आहे, अशी चौकशी केल्यावर दोन्ही चोर घाबरले. एकाने आपले नाव ठुण्या उर्फ कुणाल (वय 22) व दुसºयाने आपले नाव मयूर (वय 21) दोन्ही रा. कुंभारटोली आमगाव असे सांगितले. मात्र दोघांच्या व्यवहार व हरकतीवरून पोलिसांचा संशय आणखी मजबूत झाला. त्यांची झडती घेतल्यावर ठुण्या उर्फ कुणाल याच्या खिशात दागिने ठेवण्याची लाल रंगाची लहान पिशवी आढळली. त्यात असलेले सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. यात 4 ग्राम वजनाची एक सोन्याची अंगठी (किंमत 15 हजार), 1 नग सोन्याची नथ (किंमत 3 हजार), 10 नग सोन्याचे मणी (किंमत 15 हजार), 3 नग सोन्याचे कानातील झुमके (किंमत 15 हजार), 2 सोन्याचे पेंडल (किंमत 18 हजार), 68 नग लहान मणी (किंमत 18 हजार), 5 तोडे चांदीचे 6 नग शिक्के (किंमत 2 हजार), एक चांदीचा तुकडा, 3 जोडी चांदीचे पैजण (किंमत 2400), असा एकूण 89 हजार 600 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला सदर दागिन्यांबाबत कडक चौकशी केल्यावर आरोपी ठुण्या उर्फ कुणाल याने दागिन्यांनी भरलेली पिशवी काही दिवसांपूर्वी आपल्या सोबत्यांसह मिळून कुंभारटोली येथील एका घरातून चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर या चोरी प्रकरणात सहभागी इतर आरोपींची नावे समोर आली. या आरोपींमध्ये शुभम (वय 22) रा. इंदिरानगर, बिडी कॉलनी, डोंगरगड, हल्ली मुक्काम कुंभारटोली, सहयोग (वय 19), रिंकू गेडाम (वय 19) व एक अल्पवयीन किशोर (वय 17) सर्व रा. कुंभारटोली आमगाव यांचा समावेश आहे. सदर 6 आरोपींनी मिळून 10 ते 11 मेच्या मध्यरात्री दरम्यान कुंभारटोली येथील रहिवासी अशोक नंदेश्वर यांच्या बंद असलेल्या घरात प्रवेश करून ही चोरी केली होती.
हा चोरी प्रकरण उघड झाल्यावर चोरी गेलेले दागिने जप्त करण्यात आले व आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 5 आरोपींकडून पोलीस चौकशी करीत आहेत तर एका अल्पवयीन आरोपी किशोरला अटक करण्यात आली नाही. वाढत्या गुन्हेगारीवर आला घालण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या निर्देशने स्थानिक गुन्हे शाखेची पोलीस चमू विशेष धरपकड अभियान राबवित आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, सहायक उपनिरीक्षक लिलेन्द्र बैस व स्थानिक गुन्हे शाखेची पोलीस चमू यांनी केली़