आमदार राजू पारवे यांनी नागरिकांना लसीकरणास केले प्रोत्साहित

188

विदर्भ वतन न्युज पोर्टल, उमरेड – उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ पारवे यांनी भिसी नाका येथे टेस्टिंग व रेल्वे स्टेशन झोपडपट्टीतील लोकांना लसीकरण घेण्यास प्रोत्साहित केले. सध्या कोरोना काळात संचारबंदी सुरु आहे व अश्यातच काही लोक नियम धाब्यावर ठेवून काही काम नसतांनासुद्धा फिरत असतात. त्याकरिता लोकांचे फिरणे थांबवण्याकरिता भिसी नाका चौक येथे टेस्टिंग कॅम्प लावून बिना कामाने फिरणाºया लोकांची टेस्टिंग करून घेण्यात आली स्वत: आमदार राजूभाऊ पारवे यांनी भेट देत नागरिकांशी चर्चा केली.
तसेच रेल्वे स्टेशन उमरेड येथे लसीकरण कॅम्पला आमदार राजूभाऊ पारवे यांनी भेट देत. रेल्वे स्टेशन झोपडपट्टीतील लोकांचा घरी जाऊन त्यांना लसीकरण करिता प्रोत्साहित करून लसीकरण बद्दल जि अचूक माहिती पसरवली आहे. ती माहिती चुकीची आहे कोरोना पासून वाचण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे लसीकरण व ते घेणे गरजेचे आहे. असे प्रत्येक ४५ वरील नागरिकांना सांगितले व जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करून घावे अशी विनंती केली. यावेळी तहसीलदार प्रमोद कदम, उपविभागीय पोलीस अधीकारी भीमराव टेळे, वैदकीय अधीक्षक डॉ. खानम, नायब तहसिलदार वरपे, नगरसेवक महेश भुयारकर, विशाल देशमुख, व सुरेश वाघमारे, गुणवंता मांढरे, रितेश राऊत, मनीष शिंगणे, भूमिका लोणारे, गोलू जैस्वानी, मंगेश महल्ले, काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.