मोहगाव झिल्पी तलावात पिता-पुत्राचा बुडुन मृत्यु

263

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा तलावात बुडुन मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़ ही हृदयविकारक घटना हिंगणा हद्दीतील मोहगाव झिल्पी येथील तलावात घडली़ वेळीच नागरिकांच्या सतर्कतेने महिलेचे प्राण वाचले़ सविस्तर वृत्त असे की, संघर्षनगर येथील रहिवासह अब्दुल शहबिल आशिक, अब्दुल आसिफ अब्दुल गनी अशी मृतकांची नावे आहे़ अब्दुल आसिफ यांच्या सहा वर्षीय मुलाचा सोमवारी वाढदिवस होता़ शहरात बंदी असल्यामुळे ते वाढदिवस साजरा करण्यासाठी सहकुटुंब येथे आले़ तसेच सोबत खाद्यपदार्थही घेऊन आले़ पती,पत्नी तसेच दोन मुले संपुर्ण कुटुंबासह तलाव परिसरात काहीवेळ घालविल्यानंतर त्यांना तलावात आंघोळ करण्याचा मोह आवरला नाही़ अशातच दोघेही पिता-पुत्र तलावात शिरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडत असतांना पत्नीने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला़ मात्र उपस्थित नागरिकांनी त्यांना जाण्यास रोखल्यामुळे महिलेचे प्राण वाचले़ मात्र पिता पुत्राचा तलावात बुडाल्यामुळे मृत्यु झाला़ गोताखोरांंच्या मदतीने त्यांचे मृहदेह नदीबाहेर काढण्यात आले असून हिंगणा पोलिस पुढील तपास करीत आहे़