Home Breaking News लग्नाचे आमिष देऊन नेले जंगल परिसरात 25 जनांनी बलात्कार करून केला घात

लग्नाचे आमिष देऊन नेले जंगल परिसरात 25 जनांनी बलात्कार करून केला घात

0
लग्नाचे आमिष देऊन नेले जंगल परिसरात  25 जनांनी बलात्कार करून केला घात

लग्नाचे आमिष देऊन नेले जंगल परिसरात
25 जनांनी बलात्कार करून केला घात

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :नवी दिल्ली- फेसबुकवर मैत्री झालेल्या एका तरुणाने लग्नाची मागणी घातली. त्यानंतर वडिलांशी भेट घालून देतो म्हणून जंगलात घेऊन गेला. त्यानंतर त्या महिलेसोबत जे घडले ते अंगावर काटा उभा करणार होते. हो, एका महिलेवर २५ जणांनी आटूनपालटून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. ३ मे रोजी ही घटना घडली. ९ मे रोजी महिलेने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर हा संतापजनक प्रकार समोर आला.
पीडित महिला दिल्लीमध्ये घरगुती काम करते. चार वर्षापूर्वी ती दिल्लीत आली आणि दिल्लीतच राहायची. महिलेची सागर नावाच्या तरुणाशी फेसबुकवर ओळख झाली. जानेवारी महिन्यात दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना फोन नंबर दिले. काही काळ गेल्यानंतर आरोपी सागरने महिलेला लग्नाची मागणी घातली. त्याचबरोबर आपल्या वडिलांनाही भेटवतो, असे त्या महिलेला आरोपी म्हणाला. त्यानंतर होडल येथे आल्यास वडिलांची भेट होऊन शकते असे म्हणत २३ वर्षीय सागरने महिलेला यायला सांगितले. त्यानंतर ३ मे रोजी महिला प्रवास करून होडल येथे पोहोचली. तिथे ती आरोपी सागरला भेटली. त्यानंतर आरोपी महिलेला घेऊन रामगढमधील जंगलात घेऊन गेला. तिथे सागरचा भाऊ आणि त्यांच्या मित्रांचा घोळका होता. ते सगळे जंगलात असलेल्या हातपंपाजवळ ग्रुप दारू पित बसले होते.
महिला तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी आलटूपालटून तिच्या अत्याचार केला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी आकाश नावाच्या भंगार विक्रेत्याकडे महिलेला घेऊन गेले. त्या ठिकाणी महिलेवर पाच जणांनी बलात्कार केला. वारंवार बलात्कार करण्यात आल्याने महिलेची प्रकृती बिघडली. त्यामुळे आरोपींनी बर्दापूर सीमेवर महिलेला फेकून दिले आणि फरार झाले.
या सगळ्या भयंकर घटनेनंतर १२ मे रोजी महिला हसनपूर पोलिस ठाण्यात गेली. महिलेने आरोपीविरुद्ध तक्रार दिली. प्रकृती बिघडल्याने तक्रार दाखल करण्यास उशीर झाल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. या घटनेविषयी माहिती देताना पोलिस अधिकारी राजेश यांनी सांगितले, पोलिसांनी आरोपी सागरला शुक्रवारी अटक केली आहे. इतर आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. संबंधित कलमान्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.