Home Breaking News 12 वर्षाच्या सख्या भावाने 8 वर्षीय भावाची केली हत्या; नेमकं काय घडलं?

12 वर्षाच्या सख्या भावाने 8 वर्षीय भावाची केली हत्या; नेमकं काय घडलं?

0
12 वर्षाच्या सख्या भावाने 8 वर्षीय भावाची केली हत्या; नेमकं काय घडलं?

12 वर्षाच्या सख्या भावाने 8 वर्षीय भावाची केली हत्या; नेमकं काय घडलं?

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्थासातारा : खंडाळा तालुक्यातील 8 वर्षाच्या लहान मुलाचा निर्घृण हत्या करण्यात आली आहे. डोक्यात आणि गळ्यावर वार करून ही हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ही हत्या 12 वर्षाच्या सख्या भावाने केली असल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

खंडाळा तालूक्यातील 8 वर्षीय लहान मुलगा खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता.  सायंकाळी बराच उशीर होऊनही मुलगा घरी न आल्याचे पालकांच्या लक्षात आले. काळजीपोटी नातलग आणि शेजाऱ्यांनी शोधा शोध सुरू केली.

मुलाचा शोध घेत असताना घराजवळच्या पपईच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. यावेळी त्याच्या डोक्यावर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे निदर्शनास आले.

या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मात्र या अल्पवयीन मुलाने हा खून का केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही .