आता अंत्यविधिसाठीही करावी लागणार आॅनलाईन बुकींग – बंगलुरू मनपाचा निर्णय

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9184*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

306

आता अंत्यविधिसाठीही करावी लागणार आॅनलाईन बुकींग
– बंगलुरू मनपाचा निर्णय

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : बंगळुरू – नागरिकांना कोरोनावर उपचार घेण्यासाठी आणि लसीकरणासाठी नंबर लावावा लागत आहे.  मात्र, आता एखाद्या रुग्णाचा अथवा व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यविधीसाठी देखील नंबर लावावा लागणार आहे. त्यासाठी ऑनलाइन बुकिंग करावी लागणार असून अंत्यविधीसाठी ऑनलाईन नंबर लावण्याचा निर्णय बंगळुरू महापालिकेने घेतला आहे.
स्मशानाबाहेर अंत्यविधीसाठी रांगा लागत आहेत. मात्र, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. बंगळुरु महापालिका क्षेत्रात १८ स्मशानभूमीचा समावेश आहे. ऑनलाइन नोंदणीच्या माध्यमातून महापालिकेकडून रुग्णवाहिका अथवा अंत्यविधीचा खर्च घेतला जाणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. या सुविधेचा वापर करण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर 8495998495 प्रसिद्ध करण्यात आला आहे. 24 तास सेवा देणाऱ्या क्रमांकावर संपर्क साधून मृताच्या अंत्यविधीची संबंधित माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर अंत्यविधीची जागा आणि वेळ निश्चित केली जाईल. पुढे या अंत्यविधीसाठी एक टोकण क्रमांक दिला जाणार आहे. या हेल्पलाइन नंबरवर व्हॉट्सअॅपची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. एकदा नंबर बुक झाला की , अंत्यविधीपूर्वी अर्धातास आधी निश्चित करण्यात आलेल्या स्मशानात बोलवण्यात येईल.