विदर्भाची उत्कृष्ट पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख निर्माण होईल आमदार श्री गिरीशजी व्यास प्रयत्नाला आले यश

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9125*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

223

विदर्भाची उत्कृष्ट पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख निर्माण होईल

आमदार श्री गिरीशजी व्यास प्रयत्नाला आले यश

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : बजेट अधिवेशनात आमदार गिरीशजी व्यास यांनी सभागृहात सप्लीमेंटरी चर्चेत विदर्भाच्या पर्यटन स्थळाच्या विकासाकरिता लक्ष वेधले होते. जर विदर्भाच्या पर्यटन स्थळाच्या विकास केला तर या पर्यटन स्थळापासून राज्य सरकारला करोड रूपयाची आय होऊ शकते व वित्त महसूल द्वारा राज्याची आय वाढेल या प्रस्तावावर उपसभापती यांनी स्वयं वित्त राज्य मंत्री यांना निर्देश देऊन तुरंत एक बैठक बोलावून एक डीपीआर तयार करण्याचे आदेश निर्गमित केले . या वर मंत्री महोदय ने देखील सभेत मंजूर केले. या बाबतीत आमदार गिरीशजी व्यास यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांना पत्रव्यवहार देखील केला. त्यानंतर 7 मे 2021 रोजी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय कक्ष अधिकारी यांनी संचालक पर्यटन संचालनालय महाराष्ट्र राज्य यांना पत्र लिहूुन अभिप्राय त्वरित सादर करण्यास सांगितले आहे . या प्रयत्नाला चालना मिळालेली असून आता लवकरच या पर्यटन क्षेत्राचा नक्कीच विकास होऊन विदर्भाची उत्कृष्ट पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख निर्माण होईल, असे व्यास यांनी सांगीतले.