Home Breaking News रेमडेसिवीरचा काळा बाजार करणार्‍या आरोपींना अटक

रेमडेसिवीरचा काळा बाजार करणार्‍या आरोपींना अटक

0
रेमडेसिवीरचा काळा बाजार करणार्‍या आरोपींना अटक

रेमडेसिवीरचा काळा बाजार करणार्‍या आरोपींना अटक

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : अमरावती-जिल्हयात कोरोनाग्रस्त रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन आवश्यक असतांना रुग्णांच्या कुटूंबीयांनी त्यासाठी लांबच लाब रांगा लावल्याचे चित्र जिल्हयात अनेक दिवस दिसुन आले. मात्र इंजेक्शन उपलब्ध नसल्याचा दावा आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आला होता. तर दुसरीकडे याच इंलेक्शनचा काळाबाजार सुरू असतांना एक इंजेक्शन हे १0 ते १२ हजार रुपयाला विकण्याचा महाप्रताप खुद याच व्यवसायातील काही धूरंधरांनी केला. पोलिसांनी रेमडेसिवीरचा काळाबाजार करणार्‍या धुरंधरांना सापळा रचुन आटक केली ज्यामध्ये सहा आरोपिंचा समावेश आहे.त्यांच्याकडून १५ लाख रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांनी औषधी निरीक्षकांच्या सहकार्याने रात्री ११ वाजता बनावट ग्राहक बनून सापळा रचत ही कारवाई केली. याबाबत, याबाबत पोलीसांनी जारी प्रसिद्धीपत्रकानुसार, याप्रकरणी डॉ. पवन दत्तात्रय मालुसरे, इंचार्ज संजिवनी कोविड सेंटर, डॉ. अक्षय मधुकर राठोड,लॅब असिस्टंट सेपर कोविड, शुभम सोनटक्के,वॉडबॉय सुपर हॉस्पीटल, शुभम किल्हेकर,वॉडबॉय महाविर हॉस्पीटल, पूनम सोनोने,नर्स सुपर कोविड हॉस्पीटल, अनिल पिंजरकर लॉब असिस्टंट सुपर कोविड हॉस्पीटल.अशा सहाजणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत १0 रेमडिसिविर इंजेक्शन, सहा मोबाईल, हिरो होंडा, अँक्टिव्हा, महेंद्रा बोलेरो, मारूती ब्रेजा गाडी आदी सुमारे १५ लाख १४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.फ्रेजरपुरा पोलीस ठाणे येथे भादंवि कलम ४२0, १८८, ३४ सह औषध किंमत नियंत्रण आदेश व अत्यावश्यक वस्तू अधिनियम, औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा व साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात वपोनि कैलास पुंडकर, सपोनि पंकज चक्रे, पोउपनि राजकिरण येवले, पोहेकॉ राजेश राठोड, नापोकॉ गजानन ढेवले, नापोकॉ निलेश जुनघरे, पोकॉ चेतन कराडे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम राजिक रायलीवाले यांनी ही कारवाई केली आहे.