कोरोनाची येणार तिसरी लहर,त्यावर म्युकरमायकोसीसचा कहर

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9100*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

220

कोरोनाची येणार तिसरी लहर,त्यावर म्युकरमायकोसीसचा कहर

‘म्युकोरमायकोसिस’चे तब्बल १११ रुग्ण मुंबईत आढळले

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :मुंबई- देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून कोरोनामुळे मृत्यु होणाऱ्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट अत्यंत घातक असून आता कोरोनाबाधितांवर म्युकोरमायकोसिस या आजाराची टांगती तलवार निर्माण झाली आहे. कोरोनातून वाचले तरी हा आजार रुग्णांसाठी घातक ठरत असून या आजाराचा राज्यात पहिला बळी गेल्याचे वृत्त ताजे असतानाच या आजाराचे १११ रुग्ण मुंबईत आढळल्याची माहिती मिळत आहे.
कोरोनाचे थैमान अद्याप मुंबईत अजून सुरूच आहे. म्युकरमायकोसिसने डोकेवर काढले आहे. या आजाराचे मुंबईत १११ रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. परंतु मुंबई महापालिका प्रशासनाने यातील बहुतेक रुग्ण हे मुंबई बाहेरील असल्याचा दावा केला आहे. आजच्या स्थायी समिती सभेत भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्युकोरमायकोसिस आजाराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली.

याबाबत माहिती देताना सुरेश काकाणी म्हणाले की, मुंबईत शीव रुग्णालय 32, केईएम रुग्णालय 34, नायर रुग्णालय 38 आणि कूपर रुग्णालय 7 रुग्ण आहेत. यापैकी बहुतांश रुग्ण मुंबई बाहेरील आहेत. सदर आजार बुरशीजन्य असून संसर्गजन्य असल्याचे आढळून आलेले नाही. कोरोना रुग्णालयातील डॉक्टरांना याबाबत प्रशिक्षण दिलेले आहे. तसेच या आजारावर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा गट तयार केलेला आहे. तसेच आजाराची उपचार पद्धती उपकरणे, औषधे याबाबत निश्चिती केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान या आजारात रुग्णांच्या नाकामध्ये काळ्या रंगाची बुरशीची वाढ होऊ लागते. त्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर ती डोळे आणि मेंदूपर्यंत जाऊन पोहोचते. आजार जास्त बळावला तर रुग्णाचे डोळे काढावे लागणे किंवा मृत्यूसुद्धा संभवतो.