ग्रामीण भागात ‘म्युकरमायकोसिस’चा शिरकाव; वाशिममध्ये महिलेचा मृत्यू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वाशिम – महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असतानाच ‘म्युकरमायकोसिस’ या नव्या आजारानेही डोके वर काढले आहे. शहरांपाठोपाठ ग्रामीण भागातदेखील या आजाराने शिरकाव केला आहे. वाशिममध्ये एका ६२ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा म्युकरमायकोसिसने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर मनमाड, जुन्नरमध्येही या आजराचे रुग्ण आढळून आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्याच्या मोप येथील एका 62 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला 29 एप्रिल रोजी लेडी हार्डिंगमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या दरम्यान तिला म्युकरमायकोसिस हा आजार जडल्याचे निदान झाले होते. 11 मे रोजी तिची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी तिला अकोल्यात पाठविण्यात येणार होते. मात्र १२ मेच्या पहाटे या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

दरम्यान, नाशिकच्या ग्रामीण भागात ही म्युकरमायकोसिस या नव्या आजाराचा शिरकाव झाला आहे. येवल्यात चार तर लासलगावमध्ये 6 असे 10 रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात धनगरवाडी गावात 65 वर्षीय महिलेला कोरोनातून बरे झाल्यानंतर तीन दिवसांनी बुरशीजन्य आजार म्युकोरमायकोसिसचा संसर्ग झाल्याची घटना समोर झाली आहे.

You missed