ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी कोरोनाबाधित

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9081*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

127

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी कोरोनाबाधित

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई- मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील ख्यातनाम तसेच लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे मोहन जोशी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे. याबाबत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार मोहन यांनी काही दिवसांपूर्वीच लसीचे दोन्ही डोस घेतले होते.‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेचे मोहन जोशी हे गोव्यात चित्रीकरण करत होते. पण चित्रीकरण थांबवल्यानंतर संपूर्ण टीमसोबत ते मुंबईत परतले होते. नुकतीच त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली आणि ती पॉझिटिव्ह आल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे.

त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटला स्टोरी शेअर करत कृपया घरी राहा आणि सुरक्षित रहा. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे सांगितले होते. त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांनी चाहत्यांना घरात सुरक्षित राहण्याची विनंती केली आहे.