Home Breaking News सचिन वाझेंची मुंबई पोलीस दलातून हकालपट्टी

सचिन वाझेंची मुंबई पोलीस दलातून हकालपट्टी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9073*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

45 views
0

सचिन वाझेंची मुंबई पोलीस दलातून हकालपट्टी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांची आता पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या प्रकऱणात त्यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती.
हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून सुरु होता. २५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ कार आढळून आली होती. तर यानंतर काही दिवसांनी म्हणजेच ५ मार्च रोजी कळव्यातील खाडीमध्ये या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. दहशतवादविरोधी पथक आधी या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र, त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार, हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला.

वाझे यांना एनआयएकडून या दोन्ही प्रकरणातल्या आरोपांवरुन अटक कऱण्यात आली होती. त्यानंतर त्यांना निलंबितही करण्यात आले होते. अटकपूर्व जामीनासाठी वाझे यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. पण, त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.