रेल्वे विभागातील १ लाख कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9063*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

193

रेल्वे विभागातील १ लाख कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली – भारतात दरदिवशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे मृतांचा आकडाही वाढतोय. रेल्वे विभागातही कोरोनाने थैमान घातले असून भारतीय रेल्वेचे एक लाख कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. यापैकी जवळपास २ हजार कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

रेल्वे विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रेल्वेच्या १ हजार ९५२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून दररोज साधारण १ हजार कर्मचारी कोरोनाबाधित होत आहेत. तसेच रेल्वे विभागाचे अध्यक्ष सुनीत शर्मा म्हणाले की, ‘रेल्वे पण इतर क्षेत्र आणि राज्यांपेक्षा वेगळी नाही. आम्हीपण कोविडची प्रकरणे पाहत आहोत. आम्ही परिवहनात काम करत असतो आणि वस्तू व लोकांची ये-जा करून देत असतो. दररोज १००० कोविड प्रकरणे समोर येत आहेत. रेल्वे विभागाची रुग्णालये आहेत, आम्ही बेडची संख्या वाढवली असून ऑक्सिजन प्लांटही बसवले आहेत.’

दरम्यान, ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशन नावाने एका रेल्वे कर्मचाऱ्यांच्या फेडरेशनने काही दिवसांआधी रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांना पत्र लिहून मागणी केली होती की, ‘कोरोनाच्या संकटात काम करताना जीव गमावणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना फ्रंटलाईन वर्कर्सच्या नावाने मोबदला दिला जावा. फ्रंटलाऊन वर्कर्ससाठी देण्यात येणार ५० लाख रुपयांचा विमा हा रेल्वे कर्मचाऱ्यांनाही लागू करावा.’