Home Breaking News नाशिकनंतर आता गोव्यात ऑक्सिजन टँकला गळती, परिसरात धुराचे लोळ

नाशिकनंतर आता गोव्यात ऑक्सिजन टँकला गळती, परिसरात धुराचे लोळ

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9053*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

255 views
0

नाशिकनंतर आता गोव्यात ऑक्सिजन टँकला गळती, परिसरात धुराचे लोळ

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :पणजी – नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती होऊन २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. अशाच घटनेची पुनरावृत्ती गोव्यात झाली आहे. गोव्यातील एका जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँकला गळती लागली असून या परिसरात संपूर्ण धूर पसरला आहे. ही गळती रोखण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत.

साऊथ गोवामधील जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टँकला गळती लागली. त्यानंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. ऑक्सिजन टँक गळतीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत ऑक्सिजनची गळती रोखण्याचे प्रयत्न सुरु होते. यादरम्यान रुग्णालय परिसरात पांढऱ्या धुराचं साम्राज्य पाहायला मिळालं.

नाशिकमधील दुर्घटनेचा चौकशी अहवाल दाखल करण्यासाठी शासनाने 15 दिवसांच्या मुदत दिली होती. पण 15 दिवसांच्या मुदतीपूर्वीच हा अहवाल शासनाकडे दाखल करण्यात आला आहे.  विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली हा अहवाल तयार करण्यात आला आहे.