कोविड-19 सुरक्षा सैनिटाजर वाहन नागरिकांच्या सेवेत

-भाजपाचे प्रभाग 22 चे नगरसेवक मनोज चाफले यांचा उपक्रम

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्र. 22 चे नगरसेवक मनोज चाफले यांच्या सौजन्याने कोविड-19 सुरक्षा सैनिटाजर वाहन प्रभागाचे सैनिटाइजेशन करण्या करिता नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करण्यात आले आहे. राज्यासह शहरात कोरोना महामारीने हाहाकार माजविला असून कोविड-19 पासून बचाव करण्याकरिता शहरात जंतुनाशकाची फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे हे लक्षात घेउऊन नगर सेवक मनोज चाफले यांनी सुरक्षा सैनिटाजर वाहन नागरिकांच्या सुरक्षेकरिता उपलब्ध करून दिले आहे. सोबतच या वाहनाद्वारे कोरोना विषयची जनजागरण संदेश देण्यात येत आहे. त्यांच्या या कार्याबद्दल प्रशंसा केली जात आहे.

You missed