Home Breaking News मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9035*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

79 views
0

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था मुंबई : जवळपास वर्षभरानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची आज भेट होणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री संध्याकाळी ५ वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत.

राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने 5 मे रोजी रद्द केला. गायकवाड समितीचा अहवाल अस्वीकारार्ह असल्याचे न्यायालयाने म्हटले. मात्र मराठा आरक्षणांतर्गत आतापर्यंत झालेले प्रवेश रद्द होणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 9 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश वैध असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. मात्र न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्याने महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीत सांगितले होते. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आता हा मुद्दा थेट राष्ट्रपतींकडे मांडत आहेत. राज्याच्या विधीमंडळात सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने वरवंटा फिरवला असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता पुन्हा मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात ढकलण्यात येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले आहे, ते पत्र आता राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.