Home Breaking News लसीकरणात माघारलेल्या गावांमध्ये अधिकाऱ्यांच्या भेटी सुरू

लसीकरणात माघारलेल्या गावांमध्ये अधिकाऱ्यांच्या भेटी सुरू

0
लसीकरणात माघारलेल्या गावांमध्ये अधिकाऱ्यांच्या भेटी सुरू
Bhubaneswar: A medic works on a sample for COVID-19 Rapid Test at a camp during the nationwide lockdown imposed in a bid to contain the spread of coronavirus, in Bhubaneswar, Monday, April 20, 2020. (PTI Photo)(PTI20-04-2020_000087B)

विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर – कोरोना वर मात करण्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम पर्याय आहे. त्यासाठी लसीकरणात माघारलेली गावे व कोरोनाग्रस्त गावांना मदत करण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा गावागावात उतरली असून अशा निवडक गावांमध्ये जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांचे दौरे सुरू झाले आहे. पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या सूचनेनूसार जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी  मौदा तालुक्यातील तारसा, निमखेडा, अरोली, कोदामेढी, रामटेक तालुक्यातील मनसर, पारशिवनी तालुक्यातील करंभाड, सावनेर तालुक्यातील बळेगाव या ग्रामपंचायतीमध्ये  आढावा बैठक घेतली. लसीकरणाने कोरोनाची गंभीरता कमी होते हे सिध्द झाले असल्याने लसीकरणावर भर दयावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी  उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना  सूचित केले.
प्रशासनाने राबविलेल्या निर्बधामुळे कोरोनाचे संक्रमण काही प्रमाणात कमी होत आहे.