Home इतर आईने पोटच्या मुलाला घरातूल हाकलून दिले माणूसकीने पोलिस शिपायाने जवळ केले

आईने पोटच्या मुलाला घरातूल हाकलून दिले माणूसकीने पोलिस शिपायाने जवळ केले

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9011*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

159 views
0

आईने पोटच्या मुलाला घरातूल हाकलून दिले
माणूसकीने पोलिस शिपायाने जवळ केले

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,भद्रावती :जन्मदात्या मातेने स्वत:च्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला संचारबंदीच्या काळात काही काम धंदा करीत नाही म्हणून घरून हाकलून दिल्याने दु:खी झालेल्या त्या मुलाने आपली आपबीती सांगितल्यानंतर भद्रावती येथील पोलिस शिपाई शशांक बद्दामवार यांनी त्याच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून आसरा दिला आहे.
रितिक दिनेश पाटील (वय १६) रा. अकबरपूर (यूपी ) असे या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. रात्रीदरम्यान पोलिस शिपाई शशांक बद्दामवार हे गस्तीवर असताना त्यांना बसस्थानक परिसरात रितिक रडत असल्याचे दिसले. त्यांनी त्याच्याजवळ जाऊन विचारणा केली तू कुठला आहे? का बरं रडत आहे? तो सांगण्याच्या मनस्थितीत नव्हता. परंतु त्याला वारंवार विचारणा केली असता प्रथम त्याने मला भूक लागली असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला जेवण दिल्यानंतर त्याने आपली आपबिती सांगितली.
त्याच्या आईचे माहेर भद्रावती हे असून, ती फुकटनगर परिसरात वास्तव्यास आहे. त्याच्या आईचे लग्न यूपी येथे झाले. दोन वर्षे ती सासरी राहिल्यानंतर दोन वर्षाच्या मुलाला सोडून ती भद्रावती येथे परत आली. वडील व्यसनी असल्याने रितीकचा सांभाळ वडिलांच्या आईने केला. त्यानंतर त्याला समज आल्यानंतर तब्बल सोळा वर्षांनंतर तो आईचा शोध घेत भद्रावतीत आला. मात्र, इकडे त्याच्या आईने दुसरे लग्न केले होते. रितिकला काही दिवस स्वत:जवळ ठेवल्यानंतर त्याच्या आईने चालू असलेल्या संचारबंदीमध्ये काम धंदा का करत नाही, तुला फुकट पोसणार नाही, असे म्हणून त्याला घरातून हाकलून लावले. त्याने बसस्थानक गाठून उपाशीपोटी एक दिवस काढला. मात्र, हा प्रकार पोलिस शिपाई शशांक बद्दामवार यांना कळताच त्यानी स्वखर्चाने या मुलाची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केल्याने त्या निरागस मुलाच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत आहे. बद्दामवार यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.