Home Breaking News खाजगी दवाखान्यात मृतदेहाची झाली अदलाबदली संतप्त नातेवाईकांनी दवाखान्यात तोडफोड केली

खाजगी दवाखान्यात मृतदेहाची झाली अदलाबदली संतप्त नातेवाईकांनी दवाखान्यात तोडफोड केली

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9007*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

148 views
0

खाजगी दवाखान्यात मृतदेहाची झाली अदलाबदली
संतप्त नातेवाईकांनी दवाखान्यात तोडफोड केली

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,यवतमाळ-नेहमीच वादग्रस्त असलेल्या येथील डॉ. शहा यांच्या कोविड रुग्णालयात रविवारी एका नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर मृत झालेल्या इसमाचे शव अदलाबदल झाल्याने संतप्त नातेवाईकांनी डॉ. शहा यांच्या कोविड रुग्णालयाची मोठय़ा प्रमाणात तोडफोड केली. यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यवतमाळ येथील अँड. अरुणराव गजभिये हे कोविड पॉझिटिव्ह असल्याने यांना डॉ. शहा यांच्याकडे उपचाराकरिता भरती करण्यात आले सात दिवस उपचार केल्यानंतर आज त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूनंतर अरुणराव गजभिये यांच्यावर अंतीमसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांनी मृतदेह मागीतला असता त्यांनी सोपस्कार करुन मृतदेह ताब्यात दिला. नातेवाईकांनी अंत्यसंस्काराच्या सोपस्कारासाठी सदर मृतदेह स्मशानभुमीत नेण्यात आला. मात्र तेथे गेल्यावर सदर मृतदेह अँड. गजभिये यांचा नसल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. रुग्णालयातील गलथान कारभारामुळे अरुण गजभियेऐवजी दुसर्‍याच व्यक्तीचा मृतदेह गजभीये यांच्या नातेवाईकांना देण्यात आल्याचे लक्षात आले. यामुळे नातेवाईकांचा संताप अनावर झाला. त्यांनी स्मशान भूमीतून तो मृतदेह रुग्णालयात परत आणण्यात आला याबाबत अरुण यांचा मुलगा ललीत गजभीये यांनी डॉ शहा यांना वडीलाचा मृतदेह कुठे आहे याबाबत विचारणा केली असता डॉक्टर शहा अनुत्तरित झाले त्यामुळे गजभिये कुटुंबीयांनी अरुण यांचा मृतेदह आम्हाला द्या, अशी विनवणी केली. मात्र मृतदेह अदलाबदल झाल्याचे लक्षात आल्यावर डॉ. शहाची तारांबळ उडाली. यानंतर गजभिये कुटुंबीयांचा राग अनावर झाल्याने रुग्णालयाची तोडफोड करायला सुरवात केली. यात रुग्णालयातील साहीत्य फोडून टाकण्यात आले घटनेची माहिती अवधुतवाडी डीबी पथकाला मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून संतप्त जमावाला बाजूला सारून प्रकरण निवळण्याचा प्रयत्न केला. मात्र वादग्रस्त डॉ. शहा यांनी अरुणराव यांचा मृतदेह सुपूर्द न केल्याने नातेवाहिीकांनी रुग्णालयासमोरच ठाण मांठले होते. पोलिसांनी अँड. अणराव गजभिये यांचा मृतदेहचा पंचनामा करून गजभिये कुटुंबायांच्या ताब्यात देणार असल्याचे सांगितले. पैशासाठी हपापलेल्या डॉ. शहाकडून या अगोदरही अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकाच्या मानसिकतेचा छळ करण्यात येत आहे. डॉ. शहाविरुद्ध जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रारी करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.