शेजा-याची होती चिमुकलीवर वाईट नजर चॉकलेटच्या बहान्याने आत बोलावून केला कहर

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8997*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

277

शेजा-याची होती चिमुकलीवर वाईट नजर
चॉकलेटच्या बहान्याने आत बोलावून केला कहर

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर – कळमना हद्दीत एका नराधम वृद्धाने शेजारी राहणार्‍या दोन मुलींना चॉकलेटचे आमिष देत घरी बोलावून घेत त्यापैकी एकीवर अत्याचार केला. शनिवारी दुपारी ही संतापजनक घटना घडली. डोलचंद चव्हाण (वय ५५) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
डोलचंद चव्हाण हा मजूर आहे. तो विवाहित आहे. पीडित मुलगी सातव्या तर तिची मैत्रीण सहाव्या वर्गात शिकते. शनिवारी मुलीचे आईवडील कामावर गेले. दुपारी दोन वाजताच्या सुमारास मुलगी मैत्रिणीसोबत खेळत होती. डोलचंद याने दोघींना प्रथमत: चॉकलेट दिले. बाहेर उन्हात न खेळता घरात येऊन ‘आंधळी कोशिंबिर’ खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलाविले. त्याने दोघींच्या डोळ्यावर पट्टी बांधली. त्यानंतर १२ वर्षीय मुलीला बेडरूममध्ये नेले तर दुसरीला बाहेर थांबण्यास सांगितले. त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीने आरडाओरड केल्याने हा प्रकार पुढे आला. मुलीने शेजार्‍यांना हा सर्व प्रकार सांगितला. हा प्रकार पाहून या परिसरातील नागरिकही चांगलेच संतापले. त्यांनी नराधम डोलचंदला चांगला चोप दिला. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिस स्टेशनचे ठाणेदार विश्‍वनाथ चव्हाण हे ताफ्यासह घटनास्थळी आले. त्यांनी नागरिकांच्या तावडीतून चव्हाणला ताब्यात घेतले. पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून चव्हाण याला अटक केली. दरम्यान, नागरिकांनी वेळीच दाखविलेल्या सतर्कतेमुळे दुसर्‍या मुलीची इभ्रत वाचली.