वर्ध्यात कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराचा खर्च नातेवाईकांकडून वसूल करणार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8992*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

223

वर्ध्यात कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराचा खर्च नातेवाईकांकडून वसूल करणार

 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वर्धा-  वर्ध्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आता प्रथमच अशा मृत्यु पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून अंत्यसंस्कारासाठी २५००  रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय वर्धा महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता रुग्णाच्या मृत्यूनंतरही त्याच्या नातेवाईकांना आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.

आतापर्यंत वर्धा पालिकेने अंत्यसंस्कारासाठी महिनाभरात जवळपास ४० लाख रुपये खर्च केले आहेत. गेल्या वर्षभरात येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या हजारांवर मृतदेहांवर अंत्यसंस्कार झालेत आहेत. त्यासाठी लागणारा खर्च कुणाकडूनही घेण्यात आला नव्हता. जिल्हाधिकार्‍यांनी यासाठी आपत्ती व्यवस्थापन अथवा खनिकर्मकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले होते. निधीकरीता नगरपालिकेतर्फे प्रशासनाला कळविण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाकडून निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे वर्धा महापालिकेने नाईलाजाने अंत्यसंस्कारासाठी पैसे आकारण्याचा निर्णय घेतला आहे.